सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संत रविदास महाराज जयंती साजरी

भारतीय इतिहासामध्ये आणि साहित्यामध्ये महत्वाच

पुणे, भारतीय इतिहासामध्ये आणि साहित्यामध्ये महत्वाचे स्थान असलेले संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात कुलगुरू प्रा.(डॉ.) सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा.(डॉ.) पराग काळकर यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी प्रशालेचे संचालक प्रा. डॉ. विलास आढाव,जयकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. संजय देसले,अधिसभा सदस्य श्री. मुकूंद पांडे, कार्यकारी अभियंता विजय ढवळे, सहायक कुलसचिव डॉ. अजय ठुबे, कर्मचारी संघाचे सचिव संतोष मदने आदी मान्यवरांनी पुष्पांजली वाहून संत रविदास महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. यावेळी शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version