एकावर तत्काल कारवाई तर दुसऱ्याची पाठ राखण हे चालणार नाही – जांबुवंत सागरबाई मनोहर(अध्यक्ष पुणे शहर)
पुणे: महापुरुषांवर टीका करणे ही बाब चुकीचीच आहे. मग टीका करणारा तो कोणताही पक्ष, पंथ, जाती धर्माचा असो…! समाजवादी पक्षाचे विधायक अबू आजमी यांच्यावर तत्काल कारवाई झाली परंतु राहुल सोलापूरकर आणि डॉ. प्रशांत कोरटकर यांच्यावर कारवाई का केली जात नाही..? आम्ही स्वतः पुणे शहर कार्यकारणीच्या वतीने त्यांच्या वक्तव्याचा पिंडदान आंदोलन करून निषेध केला होता. एकावर कारवाई तर दुसऱ्याची पाठ राखण हे संविधानाला धरून न्याय सांगत नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात मनुस्मृती नुसार सरकार प्रशासन काम करताय का असा सवाल उपस्थित होतो. जर नसेल तर लवकरात लवकर राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यावर तत्काल कारवाई करा अशी मागणी समाजवादी पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष जांबुवंत सागरबाई मनोहर यांनी केली आहे.