• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Wednesday, March 4, 2026
The Dhakka
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Wednesday, March 4, 2026
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

चालत्या बस मध्ये खून आरोपीस  जन्मठेप राजगुरू खेड जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

The Dhakka by The Dhakka
January 26, 2026
in क्राईम
0

मामाचे खानदान संपवायला निघालेला भाच्यास संवेदनशील खून खटल्यात जन्मठेप .

राजगुरुनगर-खेड : येथील सत्र व जिल्हा न्यायाधीश एस पी. पोळ ह्यांचे न्यायालयाने साडे सहा वर्षांपूर्वी चालत्या एस टी. बस मध्ये घडलेल्या संवेदनशील खून खटल्यात विशेष सरकारी वकील सागर कोठारी ह्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपी अजित भगवान कान्हुरकर वय ४० रा. दावडी ह्यास दोषी धरून जन्मठेपेचीआणि दंडाची शिक्षा सुनावली.

सदर प्रकरणी हकीकत अशी कि, आरोपी अजित भगवान कान्हरकर ह्याचे मामाचे मोठ्या मुलीवर एकतर्फी प्रेम होते मात्र सदर एकतर्फी प्रेम प्रकरणास मुलीचा आणि तिचे कुटुंबियांचा त्यास विरोध होता, अनेकवेळा समजावून देखील अजित मुलीला व तिचे कुटुंबाला त्रास देत होता म्हणून अजित विरुद्ध अनेक पोलीस तक्रारी झाल्या. मात्र अजित त्यामुळे चिडून होता आणि त्याच रागापोटी मामाचे खानदान संपवायचे ह्या उद्देशाने दि. १२/०६/२०१८ रोजी पाळत ठेवून तो मामाचा मुलगा ज्या बसने शाळेत जातो त्या बस मध्ये आधीच जावून बसला. मयत मुलगा श्रीनाथ खेसे सकाळी ७.२० वाजता बस मध्ये बसल्यानंतर बस खेसे वस्तीतून ५०० मीटर पुढे गेल्यावर दबा धरून बसलेल्या आरोपी अजितने मयताचे बहिणीसमोर श्रीनाथ वर चालत्या बसमध्ये पाठीमागून सपासप डोक्यात कोयत्याने १८ वर केले त्यात मयताच्या मेंदूचा अक्षरशः भुगा झाला आणि तो जागेवरच मृत्यू पावला. सदर प्रकरणी बस पुढे पोलीस स्टेशनला नेवून मयताचे चुलते शिवाजी खेसे ह्यांनी तक्रार दिली.

सदर प्रकरणी संपूर्ण गाव दोन दिवस बंद ठेवण्यात आले तर दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते तसेच सदर प्रकरणातील ओळख परेड पंचनामा हा देखील मिसिंग होता, त्यामुळे सदरचे प्रकरण हे अत्यंत संवेदनशील झाले होते.

सन २०२० दरम्यान अॅड सागर कोठारी ह्यांची विशेष सरकारी वकील म्हणून सदर प्रकरणात नेमणूक झाली आणि सहाय्यक अॅड नारायण पंडित, अॅड विनया जगनाडे ह्यांनि मिळून सदर प्रकरणात एकूण १६ साक्षीदार तपासले त्यापैकी प्रमुख प्रत्यक्षदर्शी एस टी. बस वाहक आणि मयताची लहान बहिण ह्यांची साक्ष महत्वाची ठरली. पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, प्रदीप जाधव ह्यांनी सदर प्रकरणी तपास केला तर न्यायालयीन कामकाजात पोलीस कर्मचारी विजय चौधरी आणि खरात ह्यांनी सहभाग नोंदविला. ०७/०२/०२०२५ रोजी न्यायालयाने आरोपीस दोषी ठरविल्यानंतर सरकारपक्षातर्फे वकिलांनी आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली होती, त्यावर सोमवारी दि. १०/०२/२०२५ रोजी न्यायालयाने सर्व कायदेशीर बाबींचा विचार करून आरोपी कान्हुरकर ह्यास आजन्मठेपेची शिक्षा आणि दंड रक्कम रुपये १,००,०००/-अशी शिक्षा सुनाविली.

Previous Post

देशाला पुढे नेण्यासाठी युवाशक्ती ची आवश्यकता दत्तात्रय भरणे यांचे मत  

Next Post

नॅशनल स्कूल ऑफ स्किल फाउंडेशनच्या एकत्व फॅशन शोने जिंकली पुणेकरांची मने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Business, Small Business (1)
  • Untitled (14)
  • आरोग्य (26)
  • कृषी (19)
  • क्राईम (22)
  • क्रीडा (24)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (40)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (93)
  • राजकारण (49)
  • राज्य (93)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved