Laptop चऱ्होली येथून जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला तब्ब्ल १५ वर्षा नंतर अटक
Pune पुणे:संगणक व लॅपटॉप रिपेरिंग करणारा पुण्यातील ताडीवाल रोड वस्तीतील रहिवासी प्रशांत कांबळे कबीर कला मंचच्या संपर्कात आला. नोव्हेंबर १५, २०१० रोजी मुंबईला कामानिमित्त जातो असे सांगून तो घरातून निघून गेला, मात्र परत आलाच नाही. त्याच्या कुटुंबाने १८ जानेवारी २०११ रोजी बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे मिसिंग रिपोर्ट दाखल केला. Pune laptop
ATS ने २०११ दरम्यान संशयित माओवादी अँजेलो सोनटक्के हिला ठाण्यातून अटक केली. तिचे पुण्यात सक्रिय असणारे सहकारी आणि कबीर कला मंचचे काही कलाकारही या नक्षलवादाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आले. त्यांच्यावर प्रतिबंधित संघटना भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) चे सक्रिय सदस्य असल्याचा आरोप ठेवून UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ATS तपासात पुण्यातून मिसिंग झालेले प्रशांत कांबळे आणि संतोष शेलार हे दोन तरुण गडचिरोलीच्या जंगलात भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) संघटनेचे सक्रिय सदस्य झाल्याचे समोर आल्याने त्यांनाही या गुन्ह्यात वॉन्टेड आरोपी दाखविण्यात आले. Naxalite दोघे सर्वोच माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे सोबत काम करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. मिलिंद तेलतुंबडेलाही या गुन्ह्यात वॉन्टेड आरोपी करण्यात आहे. मिलिंद नोव्हेंबर २०२१ मध्ये गडचिरोली पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला. संतोष शेलार आजारी अवस्थेत जानेवारी २०२४ मध्ये पुण्यात घरी आला असताना ATS त्याला अटक केली.
आता पुणे ATS ने प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉप यास अटक करून ठाणे युनिटच्या ताब्यात दिले. आज रोजी ठाणे न्यायालयाने त्याला ७ दिवस पोलीस कोठडी दिली आहे. संगणक दुरुस्ती कौशल्यामुळे त्याला नक्षलवादी चळवळीत “लॅपटॉप” नाव देण्यात आले. जंगल तसेच शहरी भागात त्याच्या नक्षलवादी कामाबाबत पुढील तपास सुरु आहे. दरम्यान या गुन्ह्यातील अँजेलासह इतर आरोपी जामिनावर बाहेर आहेत. तर २०२० मध्ये कबीर कला मंचचे तीन कलाकार याना NIA ने एल्गार परिषद – कोरेगाव भीमा केसमध्ये प्रतिबंधित माओवादी संघटनेचे सक्रिय सदस्य असल्याच्या आरोपाखाली अटक केली. Yalgaar Parishad
दहशतवाद विरोधी पथकाने नक्षलवादी आरोपीला केली अटक
दहशतवाद विरोधी पथक (ATS), कळवा युनिट, ठाणे यांनी मोठी कारवाई करत तब्बल ६-७ वर्षांपासून फरार असलेला नक्षलवादी आरोपी प्रशांत जालिंदर कांबळे उर्फ लॅम्प्या याला अटक केली आहे. आरोपीविरुद्ध ठाणे डीवीपी युनिट अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल होते.
प्रशांत कांबळे हा कलम भादंवि ३५७, ४३५, ४६७, ४६८, २२०(ब) आणि अनलॉफुल अॅक्टिविटीज (UAPA) कलम १६, १७, १८, १८(ब), २०, ३८, ३९, ४०(२) अंतर्गत गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड होता. तो गुन्हे दाखल झाल्यापासूनच फरार होता. दरम्यान, तो रायगड जिल्ह्यात आदिवासी पाड्यांमध्ये लपून राहत होता व स्थानिक मुलांना शिकवत होता.
त्याच्याविरुद्ध सतत अटक वॉरंट व जाहिरनामा काढण्यात आले होते. अखेर, एटीएसच्या अधिकाऱ्यांनी २ एप्रिल २०२५ रोजी रायगड येथून त्याला अटक केली. त्यानंतर ३ मे २०२५ रोजी पुणे युनिटने ताब्यात घेतले आणि त्यानंतर पुन्हा त्याला ठाणे येथे आणले गेले. Mumbai High court
आज, ४ मे रोजी आरोपीला मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १३ मे २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास दहशतवाद विरोधी पथक करीत आहे. Pune court