ओतूर येथे बिबट्याच्या बछड्याला जीवदान.

ओतूर येथे बिबट्याच्या बछड्याला जीवदान.


ओतूर :जुन्नर येथील पानसरेवाडी येथे पाण्याच्या मोठ्या टाकी मध्ये बिबट्याचा बछडा पडला होता त्याला वनविभागाकडून सुखरूप बाहेर काढून जीवदान देण्यात आले असल्याची माहिती वनक्षेत्रापाल लहु ठोकळ यांनी दिली.ओतूरचे उपसरपंच प्रशांत डुंबरे यांनी पानसरेवाडी येथे पाण्याच्या मोठ्या टाकी मध्ये बिबट्याचा बछडा पडून अडकला असल्याची माहिती वनविभागाला दिली. त्यानुसार वनक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ,वनपाल एस.एम.बुट्टे,वनरक्षक व्ही.ए.बेले,दादाभाऊ साबळे,कैलास भालेराव,वनकर्मचारी किसन केदार,गंगाराम जाधव,गणपत केदार, फुलचंद खंडागळे यांनी व बिबट रेस्कु टीम सदस्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पिंजऱ्याच्या साहाय्याने सदर बिबट्यास पाण्याच्या टाकीतून सुखरूप बाहेर काढून माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात दाखल केले.सदर बिबट मादी असून अंदाजे तीन महिने वयाचे असल्याची माहिती वनविभागा कडुन देण्यात आली.

Exit mobile version