डिंभे रोपवाटिका येथे नियमानुसार अंत्यसंस्कार
बोरघर :परिसरांतील डिंभे धरणपाणलोट क्षेत्रातील पाण्यामध्ये बिबटया मृतावस्थेत आढळून आला. वनविभागाकडून शवविच्छेदन करून त्याच्यावर डिंभे रोपवाटिका येथे नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.बोरघर परिसरामध्ये वनरक्षक सी. के. केदारी गस्ती घालत असताना त्यांना दुपारच्या दरम्यान पाण्यामध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. त्यांनी त्वरीत घोडेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर यांना दूरध्वनीवरून माहिती दिली.त्यानंतर वनवरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर, वनरक्षक एन. एस. विरणक, जी.डी. इथापे, वनपाल एन. एच. गिन्हे, एस. के मुंढे, एस. यु. गायकवाड यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.बिबट्या पाण्यात बुडाल्याने मृतावस्थेत आढळला. त्यामुळे बिबटयाची शिकार किंवा बिषबाधा झाली आहे काय ? त्याचे सर्व अवयव सुस्थित असल्याची खात्री पशुवैदयकीय अधिकारी डी. किदार्ले व वनअधिकारी यांनी पाहणी केल्यानंतर तसे काही आढळून आले नाही. बिबट्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाले असल्याचे पशुवैदयकीय अधिकाऱ्यांनी सांगितले
बिबट हल्ला, बिबट मृत्यू अशा घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास घोडेगाव वनपरिक्षेत्र कार्यक्षेत्रातील वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्याशी त्वरीत संपर्क करण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर यांनी केले आहे.