भारतातील ६०० पेक्षा अधिक डीलरशिपमध्ये खासगी आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या प्रवासी वाहनांसाठी मॅग्माच्या मोटर विमा योजना
पुणे – भारतातील जनरल इन्शुरन्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या मॅग्मा जनरल इन्शुरन्स लिमिटेडने (मॅग्मा) ह्युंदाई इंडिया इन्शुरन्स ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड (एचआयआयबी) सोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे.उभय कंपन्यांतील करारानुसार, ह्युंदाई इंडिया इन्शुरन्स ब्रोकिंग भारतातील ६०० पेक्षा अधिक डीलरशिपमध्ये खासगी आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या प्रवासी वाहनांसाठी मॅग्माच्या मोटर विमा योजना वाहन ग्राहकांना प्रदान करणार आहे. या सहकार्यामुळे वाहन मालकांना अपघात, चोरी, नैसर्गिक आपत्ती आणि तृतीय-पक्ष दायित्वे यासारख्या जोखमींपासून संरक्षणासाठी मॅग्माच्या व्यापक मोटर विमा योजना उपलब्ध होणार आहेत. ग्राहकांना अखंड, किफायतशीर आणि सुलभ विमा सेवा प्रदान करण्याबाबतची सामायिक वचनबद्धता या भागीदारातून दिसून येते.
उभय कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत गेल्या आठवड्यात गुरुग्राममध्ये दोन्ही कंपन्यांनी या करारावर स्वाक्षरी केली.
कराराबाबत आपले विचार व्यक्त करताना ह्युंदाई इंडिया इन्शुरन्स ब्रोकिंगचे पुर्णवेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी. समीर समदानी म्हणाले, “सर्वात विश्वासार्ह अशी प्रतिमा असलेल्या या उभय विमा कंपन्यांनी तयार केलेल्या उत्कृष्ट विमा योजना ग्राहकांना सादर करत देशात विम्याचे प्रमाण अधिकाधिक वाढवणे हे आमचे ध्येय आहे. आमच्या ग्राहकांना मॅग्माच्या गतिमान दृष्टिकोनाचा आणि योजनांचा लाभ होईल, हा आम्हाला विश्वास आहे. या करारामुळे देशभरातील आमच्या सर्व ग्राहकांना “उत्कृष्ट विमा योजना आणि अतिशय उच्च अनुभव” प्रदान करण्याच्या आमच्या दृष्टीकोनाला बळकटी मिळते.”
मॅग्मा जनरल इन्शुरन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजीव कुमारस्वामी (Kumaraswami) या भागीदारीबाबत अधिक माहिती देताना म्हणाले, “भारतातील क्रमांक दोनची सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआय) च्या संपूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या ह्युंदाई इंडिया इन्शुरन्स ब्रोकिंग (एचआयआयबी) सोबत भागीदारी करण्यास आम्ही अतिशय उत्सुक आहोत. ही भागीदारी म्हणजे आमच्या प्रवासी कार पोर्टफोलिओला बळकट करण्यासाठी आम्ही घेतलेला एक धोरणात्मक पुढाकार आहे. आमच्या विविध मोटार विमा योजनांव्दारे आणि विविध ग्राहक विभागांना विमा योजनांच्या कवचात आणण्याबाबत एक दशकाहून अधिक काळ असलेल्या कौशल्याद्वारे आम्ही देशभरातील ह्युंदाई इंडिया इन्शुरन्स ब्रोकिंगच्या ग्राहकांना विमा आणि दर्जेदार सेवेची सहज उपलब्धता प्रदान करण्यास सज्ज आहोत.”
या भागीदारीच्या माध्यमातून मॅग्मा आणि ह्युंदाई इंडिया इन्शुरन्स ब्रोकिंग देशभरातील वाहन मालकांना आर्थिक सुरक्षितता आणि सुविधा सुनिश्चित करून उच्च दर्जाच्या विमा योजना प्रदान करण्याच्या वचनबद्धतेबाबत खात्री देत आहेत.