अंजली जाधव यांचा “सावित्रीच्या लेकी “राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान
पुणे : इंडियन स्टुडन्ट कौन्सिल व महाराष्ट्र संचालनालय पुरातत्व विभाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंती उत्सवाच्या निमित्ताने सौ. अंजली जाधव यांना सावित्रीच्या लेकी विशेष सन्मान २०२५” या राज्यस्तरीय पुरस्काराने नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या, थोर समाजसेविका डॉ. मेधा पाटकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. जाधव या आदर्श शिक्षिका असून त्यांना आतापर्यंत विविध पुरस्कार मिळाले आहेत .आजच्या पुरस्काराने त्यांना भविष्यातील कार्यासाठी प्रेरणा मिळेल व त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणेतून कार्य करावे अशी भावना मेधा पाटकर यावेळी व्यक्त केली . याप्रसंगी थोर समाजसेवक डॉ. बाबा आढाव, नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन इंडियन स्टुडन्ट कौन्सिलचे व महाराष्ट्र संचालनालये पुरातत्व विभाग पुणेचे अध्यक्ष डॉ. ज्ञानोबा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले वाडा, पुणे येथे झाले.
त्या “स्त्री लिखित मराठी कादंबरी लेखनातील पर्यावरणीय संवेदन” या विषयावर अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर येथे डॉ.प्रवीण ससाणे यांच्या मार्गर्शनाखाली पीएच. डी.करत आहेत.