औषधांच्या बाटल्या,सिरीज,तसेच एक्सपायरी झालेली औषधे रस्त्याच्या कडेलाच
पुणे :बेल्हा रस्त्याच्या कडेला विविध प्रकारची औषधे,रिकाम्या झालेल्या औषधांच्या बाटल्या,सिरीज,तसेच एक्सपायरी झालेली औषधे रस्त्याच्या कडेलाच विखुरलेले व फेकून दिलेले दिसत आहेत. निरगुडसर रांजणी गावाच्या पुर्वेला मंचर – बेल्हा रस्त्याच्या कडेला विविध प्रकारची औषधे,रिकाम्या झालेल्या औषधांच्या बाटल्या,सिरीज,तसेच एक्सपायरी झालेली औषधे रस्त्याच्या कडेलाच अस्ताव्यस्त अवस्थेत फेकून दिलेली आहेत . दवाखान्यामध्ये वापरलेल्या सिरींज,निडल,डिस्पोव्हॅन,प्लॅस्टीक याचा लोकांच्या आरोग्यावर व पर्यावरणावर विपरीत परिणाम होऊ शकतो तरी संबंधीत विभागाने दवाखान्याचा टाकाऊ कचरा टाकणाऱ्या संबंधिताचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे .मंचर-बेल्हा रस्त्यावर घडलेला प्रकार अत्यंत भयानक असुन आरोग्य विभागाने लक्ष घालुन दवाखान्याचा कचरा टाकणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी,नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही याची दखल आरोग्य विभागाने घ्यावी.हा रस्ता रहदारीचा असुन या ठिकाणी मेंढपाळांची जनावरे,प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर आहे तरी लवकरात लवकर प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी औषधाच्या वापरलेल्या सिरीज,बाटल्या नियमानुसार नष्ट करण्याच्या सुचना दवाखान्यांना देण्यात याव्या आंबेगाव तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ.चंद्रकांत चपटे म्हणाले की औषधे,इंजेक्शन सिरीज अशाप्रकारे फेकून देणे चुकीचे आहे.रांजणी परिसरातील सरकारी,खासगी दवाखान्यांना याबाबत कडक सूचना दिल्या आहेत.