Mercedes accident वडगाव उड्डाणपुलावरील मर्सिडीज अपघात प्रकरण
पुणे,: कात्रज vadgaon रस्ता बाह्यवळण मार्गावरील वडगाव उड्डाणपुलावरील अपघात प्रकरणात मद्यधुंद मर्सिडीज चालकासह कारमधील इतर तिघांना न्यायालयाने आठ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या चौघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. Pune
हा अपघात शनिवारी (ता. ३) पहाटे वडगाव उड्डाणपुलावर हॉटेल विश्वाससमोर घडला. भरधाव मर्सिडीज कारने धडक दिल्याने कुणाल मनोज हुशार (वय २३, रा. चिंचवड) या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला. तर, त्याचा मित्र प्रज्योत दीपक पुजारी (वय २१, रा. चिंचवड) हा गंभीर जखमी झाला आहे. Court
या प्रकरणी शुभम राजेंद्र भोसले (वय २७, रा. निगडी प्राधिकरण), वेदांत इंद्रसिंग राजपूत (वय २८, रा. निगडी प्राधिकरण), श्रेयस रामकृष्ण सोळंकी (वय २५, रा. मोरे वस्ती, पिंपरी-चिंचवड), निखिल मिलिंद रानवडे (वय २६, रा. औंध गाव) या चौघांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी या चौघांना रविवारी दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना आठ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.