शताब्दी बुद्धविहार येथे श्रामणेर शिबिराचे आयोजन
पुणे : रेंजहिल्स रहिवासी सभा व रेंजहिल्स रहिवासी महिला सभा, शताब्दी बुद्धविहार, रेंजहिल्स, पुणे, या संस्थांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे बौद्ध धम्मानुसार अभिप्रेत आणि अत्यावश्यक असलेले श्रामणेर शिबीर, श्रद्धावान उपासकांच्या सक्रिय सहभागा मधून आयोजित करण्यात येते. यंदाचे १५ दिवसीय निवासी श्रामणेर शिबीर ४ मे ते १८ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.
या वर्षीच्या शिबिरामध्ये प्रत्येक विषयांमधील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन या शिबिरार्थीना मिळणार आहे. या वर्षीच्या शिबिरामधील उत्कृष्ट श्रामणेर शिबिरार्थीना पारितोषिके देऊन पुरस्कृत करण्यात येणार आहे. प्रत्येक शिबिरार्थीना भारताचे संविधान, बुद्ध आणि त्यांचा धम्म, बुद्ध वंदना पुस्तिका…. इत्यादी पुस्तके अभ्यासासाठी मिळणार आहेत.
आदरणीय भन्ते नागघोष, महाथेरो, पुणे, आदरणीय भन्ते संघदुता, अरुणाचल प्रदेश, आदरणीय भन्ते धम्मानंद, तक्षशिला विहार, पुणे हा भिक्खू संघ मार्गदर्शक असणार आहे. तसेच आधी झालेल्या श्रामणेर शिबिरामध्ये अभ्यास वर्ग घेणारे तज्ञ मार्गदर्शक / शिक्षक / अभ्यासक यंदाही विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत, यंदाच्या शिबिरांची सुरुवात ४ मे रोजी सायंकाळी ५.३० वा, शताब्दी बुद्ध विहार, रेजहिल्स येथे प्रा. डॉ. वसंत चाबुकस्वार, प्रिन्सिपल नवरोसजी वाडिया कॉलेज, पुणे. प्रा. डॉ. विजय गायकवाड, व्हाईस प्रिन्सिपल मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स कॉमर्स, पुणे.यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सहभागी होण्यासाठी आयु. कलावंत पवार 7264862810– आयु. डि के माने 9860120462 आयु. राजाराम सोनावणे 9049039541 आयु. गौरीशंकर भोसले 9730693099 आयु. दादासाहेब थिवार 9850496459 आयु. विश्वनाथ मधाळे – 7620375119 आयुष्मती प्रभाताई सोनवणे 9881229413 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.