रॅम्प वॉक करणाऱ्यां युवतींनी उपस्थितांकडुन टाळ्यांची दाद
पुणे, प्रतिनिधी – फॅशन डिझायनर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावं या उद्देशाने नॅशनल स्कूल ऑफ स्किल फाउंडेशनच्या वतीने फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. विमाननगर येथील फिनिक्स मार्केट सिटीत या फॅशन शो चे आयोजन करण्यात आले. नृत्य, फॅशन शो अशा विविध कलागुणांचा अविष्कार निमित्ताने पुणेकरांना पाहण्यास मिळाला. विद्यार्थ्यांनी सर्जनशील मनाने तयार केलेली फॅशन डिझायनिंग कलाकृतीला चालना मिळावी त्यांचा उत्साह वाढला जावा यासाठी दिमाखदार पद्धतीने फॅशन शो पुण्यात नुकताच रंगला होता.
विविध कलाकृतीने बहरलेल्या फॅशन शोमध्ये आत्मविश्वासाने रॅम्प वॉक करणाऱ्यां युवतींनी उपस्थितांकडुन टाळ्यांची दाद मिळवली. यावेळी संदीप युनिव्हर्सिटीचे आर्यन झा, दिशा अकॅडमीचे संचालक डॉ. नितीन कदम, मिनीऑरेंज सिक्युरिटी सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिर्बान मुखर्जी, सुशांत गडांकुश, पुणे कॅम्ब्रिज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे संचालक डॉ. चंद्रकांत कुंजीर, नामवंत फॅशन डिझायनर, निखिल माळवदे, मुग्धा माळवदे, नामवंत डिझायनर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी फॅशन, ग्लॅमर आणि स्टाइलच्या माध्यमातून सुंदर अशा या सहा प्रकारच्या मनमोहन संकल्पनेतून विद्यार्थींनी साकारलेल्या विविधतेतून एकता दाखवणारा हा फॅशन शोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
नॅशनल स्कूल ऑफ स्किल्स फाउंडेशन २०१७ पासून फॅशन डिझाईन, इंटिरियर डिझाइन,ॲनिमेशन आणि व्हिएफएक्सच्या पदवी/डिप्लोमा अभ्यासक्रमांसह विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणाची सुविधा देत आहे. प्रत्येक वर्षी साधारण अडीचशे विद्यार्थी या संस्थेमध्ये सहभागी होतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून आज अनेक लोक आपल्या कला सादर करून त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे फॅशन ही इंडस्ट्री केवळ उच्चभ्रूवर्गीयांसाठी राहिलेली नसून ती आता सर्वसामान्यांसाठी सुद्धा उपलब्ध झालेली आहे. एकत्व फॅशन शोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांची प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी NSS फाऊंडेशन कायमच कटीबद्ध असते अशी भावना निखिल माळवदे यांनी व्यक्त केली.