भाविकांसाठी माेफत व्हीआर वेब ॲप्लिकेशन विकसित
पुणे, प्रतिनिधी -श्री गणेश हे लाखाे भक्तांचे श्रध्दास्थान असून भगवान गणेशाच्या वेगवेगळया आख्यिका आ. महाराष्ट्रात गणेशाला महत्वपूर्ण स्थान असून चारधाम प्रमाणे अष्टविनायक तीर्थयात्रा करण्याचा अनेकांचा संकल्प असताे. परंतु आराेग्य, वय आणि भाैगाेलिक अंतरामुळे ते दरवेळी शक्य हाेईल असे हाेऊ शकत नाही. त्यामुळे ही बाब लक्षात घेत ऑगमनट कंपनीने पुढाकार घेत एक व्हीआर वेब ॲप्लिकेशन विकसित केले आहे. ज्यामाध्यमातून आता भाविकांना माेफत घरबसल्या अष्टविनायक तीर्थक्षेत्राचा अनुभव प्रत्यक्ष घेता येऊ शकणार आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, भाजप नेते माधव भंडारी, अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या उपस्थितीत पुण्यातील पेशवेकालीन सारसबाग गणेश मंदिरात साेमवारी प्रकाश पार पडले.
यावेळी कंपनीचे संचालक अमित गिलरा, सारसबाग गणपती ट्रस्टचे विश्वस्त सुधीर पंडित, रांजणगाव गणपती मंदिर ट्रस्टचे संचालक तुषार पासुंदे उपस्थित हाेते.
प्रकाश जावडेकर म्हणाले, अष्टविनायक मंदिराचे दर्शन करणे वेळेनुसार प्रत्येकाला शक्य हाेईल असे हाेत नाही. ज्येष्ठ नागरिकांना आराेग्याचे समस्या देखील जाणवतात. मात्र, अष्टविनायक राज्याचे श्रध्दास्थान असल्याने त्याचे आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने माेबाईलवर क्यूआर काेड स्कॅन करुन व्हीआर वेब ॲप्लिकेशन माध्यमातून अष्टविनायक तीर्थयात्रा भाविकांची पार पडणार आहे. देशाचा भाव हा भक्तिभावाचा असून त्याला आधुनिक साज देण्याचे काम तंत्रज्ञानाचा माध्यमातून हाेत आहे.
अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी सांगितले की, प्रत्यक्ष अष्टविनायक मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन याबाबतचे व्हिडिओ शुटिंग झाले असल्याने प्रत्यक्ष भाविकांना गणरायाचे जवळून दर्शन घडणार आहे. परिश्रमपूर्वक हे काम करण्यात आले असून ज्यांना अष्टविनायक यात्रा करणे शक्य नाही त्यांना आता घरबसल्या २४ तास दर्शनाचा लाभ भाविकांना मिळणार आहे.