सप्तरंगी कला प्रदर्शनाचे आयोजन

टॅलेंटिला फाऊंडेशनतर्फे 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान सप्तरंगी कला प्रदर्शनाचे आयोजन

पुणे : कला, भारतीय संस्कृती आणि पर्यावरणाला समर्पित हिसारच्या , टैलेंटिला फाउंडेशन या सामाजिक संस्थेने पुण्यातील  यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरीमध्ये 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 दरम्यान एक समूह कला प्रदर्शन ‘सप्तरंगी’ आणि सन्मान समारंभाचे आयोजन केले आहे.

सप्तरंगी कला प्रदर्शनाचे उद्घाटन भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत 31 जानेवारी रोजी होणार आहे. या कला प्रदर्शनात देश-विदेशातील प्रसिद्ध कलाकार हरिप्रिया नरसिंहान, सोनल सक्सेना, मोनिता ढींगरा, केदारनाथ भागवत, राखी कुमारी, दत्तात्रय खेळकर, सुधीर करणडे, अर्चना श्रीवास्तव, रचना सिंह, हेरिबेर्टो नोपनी, नरेंद्र गंगाखेडकर, सतीश पोटदार, धात्री थानकी, कारमेला न्यूनेज, संजय उमरानीकर, निहारिका श्रीवास्तव, जयश्री पाटील, क्रेजेंटा कदम, आर्या कुलकर्णी, माधुरी गयावाल, विनय जोशी, हीरालाल गोहिली, प्रीती राऊत, विभावरी देसाई, इशिता रामाप्रसाद, अंजन रॉय, सोलेदाद बुरगालेता इत्यादी त्यांच्या कलेचे प्रदर्शन करतील. या आर्ट प्रदर्शनीत देश-दुनियेस विविध कलाकृतींचे प्रदर्शन केले जाणार आहे. महत्वाचे म्हणजे, टैलेंटिला फाउंडेशनने पूर्वीही अनेक कला प्रदर्शने, कार्यशाळा आणि सेमिनार आयोजित केले आहेत आणि देश-विदेशातील कलाकृती प्रदर्शित केले आहेत.

टैलेंटिला फाउंडेशनच्या संस्थापक आणि संचालक अनुराधा खरे आणि विनीत खरे यांनी सांगितले की, टैलेंटिला फाउंडेशनद्वारे पुण्यातील हे दुसरे कला प्रदर्शन आहे. या कला प्रदर्शनात  विविध प्रकारच्या कलांचे प्रदर्शन केले जाणार आहे, ज्यामध्ये देशातील प्रसिद्ध कलाकार संजय उमरानीकर, मोनिता ढींगरा, विभावरी देसाई, केदारनाथ भागवत आर्ट डेमो देतील आणि सर्व कलाकारांना सन्मानित केले जाईल. हे प्रदर्शन 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान दुपारी 12 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहणार असून सर्वांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे.

Exit mobile version