पंडित अजय जोगळेकर (मुंबई), पंडित विनय मिश्रा (दिल्ली) यांना सन्मानित केले जाणार
पुणे : भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे शुक्रवार, दि. 21 फेब्रुवारी 2025 रोजी गुरू गौरव, संगीत गौरव आणि संगतकार पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त पुरस्कारप्राप्त कलाकारांची सांगीतिक मैफल आयोजित करण्यात आली आहे.
कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता गांधर्व महाविद्यालय, पुणे येथील विष्णू विनायक स्वरमंदिरात आयोजित करण्यात आला आहे. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर गुरू गौरव पुरस्काराने सुप्रसिद्ध गायक पंडित विनायक तोरवी (बंगळुरू), पंडित विनायक बुवा पटवर्धन संगीत गौरव पुरस्काराने ज्येष्ठ संवादिनी वादक डॉ. अरविंद थत्ते (पुणे), पंडित चंद्रकांत कामत संगतकार पुरस्कराने तबला वादक पंडित रवींद्र यावगल (बंगळुरू) तर पंडित तुळशीदास बोरकर संगतकार पुरस्कराने संवादिनी वादक आहे, अशी माहिती गांधर्व महाविद्यालय, पुणेचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. पुरस्काराचे वितरण एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांच्या हस्ते होणार आहे.
या प्रसंगी पंडित विनय मिश्रा यांचे संवादिनी एकल वादन, पंडित रवींद्र यावगल यांचे तबला एकल वादन होणार आहे. या नंतर पंडित विनायक तोरवी यांचे गायन होणार असून त्यांना पंडित रवींद्र यावगल (तबला), पंडित विनय मिश्रा (संवादिनी) साथसंगत करणार आहेत.कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.