• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Tuesday, March 3, 2026
The Dhakka
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Tuesday, March 3, 2026
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

पुण्यातील डॉ. डुंबरे पाटील ‘आयर्नमॅन’ कुटुंबाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समधे नोंद

The Dhakka by The Dhakka
January 26, 2026
in क्रीडा
0

  • इटलीतील आयर्नमॅन स्पर्धेत डॉक्टर पती-पत्नी, मुलगा व मुलीची विक्रमी कामगिरी; कुटुंबातील चौघांनी स्पर्धा पूर्ण करण्याची पहिलीच वेळ

पुणे: शहरातील डॉ. डुंबरे पाटील कुटुंबाने इटलीत नुकत्याच झालेल्या ‘७०.३ आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धे मध्ये बाजी मारत पुण्याचा आणि भारताचा झेंडा जगाच्या नकाशावर रोवला आहे. हडपसरमध्ये राहणारे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. संपत शिवाजीराव डुंबरे पाटील, त्यांच्या पत्नी रेडिओलॉजिस्ट डॉ. वैशाली डुंबरे पाटील, कन्या प्राची व मुलगा प्रसाद यांनी ही स्पर्धा निर्धारित वेळेत पूर्ण करत विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. हा विक्रम झाल्याचे मानपत्र नुकतेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या वतीने डॉ. चित्रा जैन यांनी डुंबरे पाटील कुटुंबाला प्रदान केले.

‘आयर्नमॅन ट्रायथलॉन’ ही स्पर्धा इटलीतील रोमालिया येथे २२ सप्टेंबर २०२४ रोजी झाली. या स्पर्धेत डॉ. संपत, डॉ. वैशाली आणि बीजे वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे अंतिम वर्षात शिकणारी प्राची व प्रथम वर्षात शिकणारा प्रसाद यांनी सहभाग घेतला. एड्रियाटिक समुद्रामध्ये १.९ किमी पोहणे, त्यानंतर लगेच ९० किमी सायकल चालविणे आणि २१ किमी धावणे असे या स्पर्धेचे स्वरूप होते. ही संपूर्ण स्पर्धा आठ तासात पूर्ण करण्याचे आव्हान स्पर्धकांसमोर होते.

विविध देशातील ३५०० पेक्षा जास्त स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. पोहण्याच्या वेळी समुद्रातील लाटांचा व सायकलिंगच्या वेळी प्रचंड वारा व चढ उतारांचा सामना स्पर्धकांना करावा लागला. परंतु डुंबरे-पाटील कुटुंबातील चारही सदस्यांनी शारीरिक व मानसिक आव्हानांवर मात करत अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेसाठी चौघेही गेल्या ८ ते १० महिन्यांपासून प्रचंड मेहनत घेत होते. प्राची व प्रसाद दोघांनीही आपला अभ्यास सांभाळून स्पर्धेसाठी सरावाला वेळ दिला.

डॉ. संपत डुंबरे पाटील म्हणाले, “ही स्पर्धा आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे. एकाच कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकाच स्पर्धेत अशी कामगिरी करणे हे केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील एकमेव उदाहरण आहे. अभ्यासाबरोबरच आपल्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी मुलांनी सजग राहावे, हा या मागचा हेतू होता. व्यायाम व शरीर स्वास्थ्यासाठी एकत्र आल्यामुळे आमच्यातील फॅमिली बॉन्डिंग खूप छान झाले आहे.”

कु. प्राची डुंबरे पाटील म्हणाली की, “आयर्नमॅन स्पर्धेसाठी तंदुरुस्ती खूप महत्वाची असते. निर्धारित वेळेत ही स्पर्धा पूर्ण करताना आमच्या चौघांचे छान टीमवर्क झाले. या फिटनेसमुळे आम्हाला इतर गोष्टींमध्ये चांगला फायदा होत आहे. आई-वडिलांसोबत अशी आंतरराष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा जिंकताना आनंद झालाच; पण त्यांच्याविषयीचा आदरही वाढला.”

डॉ. चित्रा जैन यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने डुंबरे पाटील कुटुंबाच्या विक्रमाची नोंद घेतली असून, या ऐतिहासिक कामगिरीबद्दल अभिनंदन करत असल्याचे नमूद केले. या स्पर्धेच्या तयारीसाठी योग्य मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक चैतन्य वेल्हाळ, स्ट्रेंथ ट्रेनर पियूष कुमार, स्विमिंग प्रशिक्षक शुभंकर झरे, योगप्रशिक्षक आराध्या व अविनाश यांना डुंबरे-पाटील कुटुंबाकडून यावेळी सन्मानित करण्यात आले.

“स्पर्धेच्या शेवटच्या काही दिवसात अनेक अडथळे आले. प्राचीच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने तिला ३ महिने वॉकर वापरावा लागत होता. परिणामी तिचा व्यायाम नीट होत नव्हता. स्पर्धेच्या १५ दिवस आधी तिने मेहनत घेत ताकद मिळवली. प्रसादचीही बारावी व ‘नीट’ परीक्षेची तयारी सुरु होती. अभ्यास सांभाळून त्यानेही प्रशिक्षण पूर्ण केले व आयर्नमॅन स्पर्धेसोबतच बी. जे . वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला. मुलांना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले, तर मुले निश्चितच त्यात यशस्वी होतात. नियमित व्यायामाचा दोन्ही मुलांना त्यांच्या अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी खूप उपयोग झाला. त्यांची शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती निश्चितच वाढली. या स्पर्धेच्या तयारीसाठी एकत्रित केलेला हा प्रवास आमच्यासाठी अतिशय आनंददायी व अविस्मरणीय आहे. ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने त्याची नोंद घेतली, याचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे.”

Previous Post

बाराशे धावपटूंनी दिला‘रन फॉर किडनी’चा संदेश

Next Post

खाद्यसंस्कृती धर्माशी जोडणे चुकीचे: शाहू पाटोळे…….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Business, Small Business (1)
  • Untitled (14)
  • आरोग्य (26)
  • कृषी (19)
  • क्राईम (22)
  • क्रीडा (24)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (40)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (93)
  • राजकारण (49)
  • राज्य (93)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved