शरद पवार आजारी  चार दिवसातील सर्व दौरे रद्द

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दौरे करताना पाहायला मिळत आहेत.मात्र पुढील चार दिवसांचे त्यांचे दौरे रद्द करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देण्यात आली आहे.

गेले दोन दिवस शरद पवार हे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्या दरम्यान आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये शरद पवार यांना बोलताना अडचण होत होती. त्यानंतर  आता शरद पवार यांच्या तब्येतीबाबत नवी माहिती समोर आली आहे. शरद पवार यांचे स्वास्थ्य ठीक नसल्याने पुढील चार दिवसाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे.

खोकला असल्यामुळे बोलण्यास त्रास होत आहे. म्हणून त्यांना कार्यक्रमात भाषण करण्यास अडचण निर्माण होत आहे. या कारणास्तव त्यांचे पुढील ४ दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचं प्रशांत जगताप यांनी सांगितला आहे.

त्यामुळे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात होणाऱ्या ध्वजारोहण समारोहाला शरद पवार उपस्थित राहणार नाहीत. ७५ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी स्थायी समिती अध्यक्ष श्रीकांत शिरोळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न होणार आहे. माहिती प्रशांत जगताप यांनी दिली आहे.

Exit mobile version