तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाची जय्यत तयारी सुरू

तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाची जय्यत तयारी सुरू

३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत कवी संमेलन, परिसंवाद, बालसाहित्यावर चर्चा, कार्यशाळा, चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

पुणे: राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर येत्या शुक्रवारी ३१ जानेवारीपासून होणाऱ्या तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून, तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात साहित्यिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी वाहिलेल्या संमेलनात कवी संमेलन, परिसंवाद, बालसाहित्यावर चर्चा, कार्यशाळा, चर्चासत्र, मराठी भाषेशी संबंधित सादरीकरण यांच्यासोबतच दररोज सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. संमेलनात नामवंत साहित्यिक, लेखक, कवी, कलाकार, संपादक यांचे विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती विश्व मराठी संमेलनाच्या नियोजन समितीच्या सदस्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने विश्व मराठी संमेलनाच्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेचे आयोजन फर्ग्युसन महाविद्यालयात करण्यात आले होते. यावेळी विश्व मराठी संमेलन संयोजन समितीचे सदस्य राजेश पांडे, भटकर, सुनील महाजन, डॉ. सतीश देसाई, सुनंदन लेले, आनंद काटिकर आदी उपस्थित होते.

पांडे म्हणाले की, विश्व मराठी संमेलन फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या मंडपात, अँम्फी थिएटर आणि बालगंधर्व रंगमंदिरात ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत रंगणार आहे. मैदानावर उभारण्यात आलेल्या मुख्यमंचाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अँम्फी थिएटरला थोर विचारवंत प्र. के. अत्रे यांचे नाव देण्यात आले आहे. या तिन्ही दिवशी रसिकांना भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी मिळणार असून, सर्व कार्यक्रम विनामूल्य राहणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ३१ जानेवारीला सकाळी ११ वाजता होईल. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार , केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह लोकप्रतिनिधींची उपस्थिती राहणार आहे. या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना साहित्य भूषण पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांची उपस्थिती राहणार आहे. या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर संमेलनातील विविध कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. संमेलनाच्या स्थळी साधारण पुस्तकांची १०० दालने राहणार आहेत. नागरिकांच्या सुविधेसाठी फूड कोर्ट राहणार आहे. संमेलनातील सर्व कार्यक्रम विनामूल्य असल्याने, अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संमेलनाचा समारोप २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे, असे पांडे यांनी सांगितले.
…..
बालगंधर्व रंगमंदिरापासून शोभा यात्रा
…..
विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटनाच्या पूर्वी शुक्रवारी ३१ जानेवारी रोजी सकाळी ९ ते १०.३० या वेळेत भव्य अशी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ही शोभायात्रा बालगंधर्व रंगमंदिरापासून ते फर्ग्युसन कॉलेजपर्यंत राहणार आहे. या शोभायात्रेत नाशिक ढोल च्या गजरात मराठमोळे फेटे बांधून ज्येष्ठ मराठी साहित्यिक, परदेशी मराठी भाषिक, कलावंत, महिला आणि युवा लेखकांचा सहभाग राहणार आहे, अशी माहिती आनंद काटिकर पत्रकार परिषदेत देण्यात आले
…….
संमेलनातील पहिल्या दिवसाचे म्हणजेच ३१ जानेवारीचे कार्यक्रम
स्थळ : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मुख्यमंच
……
वेळ – सकाळी ११ ते १.०० –

Exit mobile version