आजोबा अमृता मोहोळ यांच्या नंतर नातू पृथ्वीराजने खेचून आणली महाराष्ट्र केसरीची मानाची गदा
मुठा (ता.मुळशी) येथील पृथ्वीराज मोहोळ यावर्षीच्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला आहे. पृथ्वीराजने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडवर दोन विरु्दध एक गुणांनी विजय मिळविला आहे. अहिल्यानगर येथे जालेल्या महाराष्ट्र केसरी किताबाच्या या कुस्तीच्या अंतिम सामन्यात शेवटचे सहा सेकंद उरलेले असताना महेंद्र गायकवाडने मैदान सोडल्याने पंचानी पृथ्वीराजला विजयी घोषित केले. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पृथ्वीराजला चांदीची गदा देऊन गौरविण्यात आले. आयोजकांकडून पृथ्वीराजला थार गाडीही बक्षीस देण्यात आली.
पृथ्वीराजने मुळशी तालुका निवड चाचणीपासूनच कोणत्याही प्रतिस्पर्धी मल्लाला कमी न लेखण्याची खबरदारी घेतली होती.