प पू .दिघे मावशी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण
पुणे :अध्यात्मिक गुरू प पू .दिघे मावशी यांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या ‘निर्मिती ‘या ग्रुपतर्फे घेण्यात आलेल्या ‘क्रिएटिव्ह माईंड्स ‘ या आंतरशालेय निबंध,चित्रकला,रांगोळी आणि मेहेंदी या स्पर्धाचा बक्षीस समारंभ रविवारी उत्साहात पार पडला. मुक्तांगण शाळेचे सभागृह(अरण्येश्वर) येथे सकाळी ९ वाजता हा कार्यक्रम झाला.या स्पर्धेत १० शाळेतील ५०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.या समारंभात एकूण १२० बक्षीसे देण्यात आली.या कार्यक्रमाला प.पू.दिघे मावशी ,संजीव दिघे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.अनुष्का दिवेकर,शिल्पा घोडके,शंतनू गाढवे,प्रतीक अथाणे, शेखर केंदळे, सुमेधा खाडिलकर, पंकजा गुलाबकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.सर्व स्पर्धात मिळून नुमवी मुलींची प्रशाला,बाबूराव घोलप शाळा यांना विभागून प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले.
‘स्पर्धेतील सर्व स्पर्धकांनी चांगले सादरीकरण केले आहे.या विद्यार्थी स्पर्धकांना तयार करणाऱ्या शिक्षकांचे कामही कौतुकास्पद आहे.विद्यार्थी स्पर्धकांनी भावी आयुष्यात कलेवर प्रेम करावे,कलागुणांवर प्रेम करावे.या ध्यासातून सर्वाना आणखी मोठे होता येईल’,अशा शब्दात प.पू.दिघे मावशी यांनी विजेत्यांना आशीर्वाद दिले.राष्ट्रगीत आणि शैलेश्वर प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.प्रास्ताविकात अनुष्का दिवेकर यांनी स्पर्धेमागची भूमिका स्पष्ट केली. अश्विनी यांनी सूत्रसंचालन केले.शाळांचे मुख्याध्यापक ,विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.