विनोदी लेखन सांस्कृतिक ठेवा व्हावा : भाग्यश्री देसाई
पुणे:
विजय पटवर्धन फाऊंडेशन आयोजित ‘निर्मला -श्रीनिवास विनोदी लेखन स्पर्धा – २०२५ ‘ चा पारितोषिक वितरण समारंभ १२ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता निळू फुले कला अकादमी (लाल बहादूर शास्त्री रस्ता)येथे झाला.निर्माती, अभिनेत्री भाग्यश्री देसाई, नाट्य अभिनेते दीपक रेगे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
डॉ.अविनाश भोंडवे यांनी प्रथम क्रमांकासाठीचे ५ हजार पारितोषिक पटकावले.द्वितीय क्रमांकासाठीचे ३ हजार रुपयांचे पारितोषिक अवंती कोटे यांना मिळाले.तृतीय क्रमांकासाठी २ हजार रुपयांचे पारितोषिक स्मिता दामले- कुलकर्णी यांना देण्यात आले.
अभिनेते विजय पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले.
चिन्मय पाटसकर यांनी यांनी सूत्रसंचालन केले.५९ लेखकांनी या स्पर्धेत भाग घेतला. दीपक रेगे, अक्षय वाटवे यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.
स्पर्धेचे यंदाचे हे चौथे वर्ष होते. विजेत्या लेखकांनी त्याचे वाचन केले.
सौ. वृषाली पटवर्धन, अभिजित इनामदार,
किशोर कुलकर्णी, मधुरा टापरे-आगरकर,योगेश सोमण,धनंजय आमोणकर, सुरेंद्र गोखले, प्रशांत तपस्वी, राजू बावडेकर इत्यादी उपस्थित होते.
भाग्यश्री देसाई म्हणाल्या,’ही विनोदी लेखन स्पर्धा महाराष्ट्रातील सांस्कृतिक जीवनातील महत्वाचा उपक्रम आहे. नव्या, ताज्या विनोदी लेखनाला प्रोत्साहन देणारे व्यासपीठ या निमित्ताने उपलब्ध झाले आहे. त्यातून महाराष्ट्राला नवा ठेवा मिळण्याची अपेक्षा आहे.स्पर्धेनंतर किंवा आधी या लेखकांना कार्यशाळेतून मार्गदर्शन केल्यास लेखकांना आणखी पुढे जाण्यास मदत होईल.’
‘विनोदी लेखन ही कला आहे.भावना दुखावण्याच्या काळात विनोद निर्मितीच्या सर्व शक्यतांचा विचार करावा. बोचरी टीका आणि विनोदी तिरकसपणा यातील फरक कळला पाहिजे.लिहिलेली कथा परत वाचावे. सर्व हत्यारे वापरावी, कथेचा आनंद वाचकाना मिळणे हा उद्देश विसरता कामा नये,असा सल्ला परीक्षक अक्षय वाटवे यांनी यावेळी बोलताना दिला.
……..