पुणे : – संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ. संजय तांबट यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय अभ्यास शाखेचा अधिष्ठाता म्हणून पदभार स्वीकारला. कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी प्र- कुलगुरू प्रा. डॉ.पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ.ज्योती भाकरे, व्यवस्थापन परिषद सदस्य श्रीमती बागेश्री मंठाळकर, परिक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. प्रभाकर देसाई, प्रा. विनायक जोशी,प्रा. संदीप नरडेले, प्रा. योगेश बोराटे तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
या शाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रभाकर देसाई यांची प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ या पदावर कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी नियुक्ती केल्यामुळे सदर पद रिक्त झाले होते. त्यामुळे कुलगुरूनी सदर शाखेच्या अधिष्ठाता पदावर डॉ. तांबट यांची नियुक्ती केली.