सकल हिंदू समाज पिंपरी चिंचवड शहर च्या वतीने सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन
पिंपरी,पहलगाम, काश्मीर या ठिकाणी हिंदू बांधवांवर दहशतवाद्यांनी जो अमानुष गोळीबार करून त्यांची हत्या केली. या घटनेमुळे समाजात संताप व्यक्त केला जात आहे. त्याच्या निषेधार्थ उद्या रविवारी (दि.२७ एप्रिल) सायंकाळी ५ वाजता साई चौक, पिंपरी येथून सकल हिंदु समाजाच्या वतीने निषेध करीत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व हिंदु बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पिंपरी चिंचवड सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.