शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे उपशहर प्रमुख राजेश पळसकर यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत त्यांच्या ३०० कार्यकर्त्यांसोबत उपमुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश शिवसेनेत केला. पिंपरी चिंचवड मधील स्व. रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांनी राजेश पळसकर यांचे व त्यांच्या कार्यकर्त्यांचे शिवसेनेमध्ये स्वागत केले. महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री मा.उदयजी सामंत व मावळचे खासदार मा.श्रीरंगअप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली व विश्वजीत बारणे आणि रुपेश कदम यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी राजेश पळसकर यांच्या सोबत आनंद भिलारे उपशहर समन्वयक युवा सेना पुणे शहर, अनिराज कुऱ्हाडे उपविभाग प्रमुख युवासेना, मयूर भालेकर उपविभाग प्रमुख, भूषण लोहार, ऑड. सूर्यप्रताप रणनवरे उपप्रमुख मनसे विधी विभाग पुणे, कैलास मोरे उपविभाग प्रमुख, रोहित पळसकर प्रभाग प्रमुख, निशांत सातपुते यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.