संभाजी ब्रिगेड उद्या पोलिसात तक्रार दाखल करणार – संतोष शिंदे
पुणे:राहुल सोलापूरकर हा विकृत माणूस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करून सुद्धा राज्य सरकारने कुठलीही कायदेशीर कारवाई केली नाही. आता विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सुद्धा राहुल सोलापूरकरणे अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने विधान करून बदनामी केलेले आहे. संभाजी ब्रिगेड हे खपवून घेणार नाही. सामाजिक विद्वेष पसरवायचा, जातीय द्वेष पसरवायचा किंवा समाजात सामाजिक तेढ निर्माण करण्याचा राहुल सोलापूरकर आणि त्याच्या गॅंगचा उद्देश असावा. सरकारने तो स्वतःच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून पाठीशी घालू नये. संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही.राहुल सोलापूरकर ला सरकारने तात्काळ अटक करून त्याच्यावर महापुरुषांची बदलामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचा गुन्हा दाखल करावा. संभाजी ब्रिगेड उद्या पुणे पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा देणार आहे.