• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Monday, March 2, 2026
The Dhakka
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Monday, March 2, 2026
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

संगीत आनंदमठ पहिल्यांदाच मराठी रंगभूमीवर

The Dhakka by The Dhakka
January 26, 2026
in मनोरंजन
0


ऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंदमठ साहित्यकृतीवर आधारित नाट्याविष्कार

पुणे : ऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेल्या, भारतीय अध्यात्म, राष्ट्रभक्ती यांचा अपूर्व संगम असलेल्या अर्वाचीन भारतीय साहित्यातील आनंदमठ या अजरामर कादंबरीवर आधारित संगीत आनंदमठ ही नाट्यकृती पहिल्यांदाच मराठी रंगभूमीवर येत आहे.
1870 च्या दशकात बिहारपासून आजच्या बांगलादेशपर्यंतच्या भूमीवर संन्याशांनी इंग्रज व बंगालमधील तत्कालीन सत्ताधीशांविरुद्ध केलेल्या सशस्त्र लढ्याचे चित्रण करणारी आनंदमठ ही कादंबरी आहे. यात नवरसांच्या आविष्कारांसह वीर आणि भक्ती रस केंद्रस्थानी आहेत.
या कादंबरीने स्वातंत्र्यलढ्यातील अरविंद घोष, नेताजी सुभाषचंद्र बोस अशा अनेक महत्त्वाच्या नेत्यांना क्रांतिलढ्याची प्रेरणा दिली. 7 नोव्हेंबर 1875 कार्तिक शुद्ध नवमीच्या दिवशी बंकिमचंद्रांनी वन्दे मातरम्‌‍ हे अमर काव्य लिहिले. 2025 हे वर्ष या तेजस्वी गीताचे 150 वे (सार्ध शती) स्फुरण स्मरण वर्ष असल्याने या संगीत नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग दि. 4 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला आहे, असे वंदे मातरम्‌‍चे अभ्यासक, नाटकाचे सूत्रधार मिलिंद सबनीस यांनी सांगितले.
1880 ते 1882 या काळात बंगदर्शन या अंकातून आनंदमठ कादंबरी क्रमशः प्रकाशित झाली. लगेचच डिसेंबर 1882 मध्ये आनंदमठ पुस्तक स्वरूपात आली. त्यानंतर 1883 मध्ये आनंदमठ नाट्यरूपात बंगाली रंगभूमीवर सादर झाली. सव्वाशे वर्षांनंतर ही साहित्यकृती प्रथमच मराठी रंगभूमीवर येत आहे.कोलाज क्रिएशन्स या पुण्यातील प्रायोगिक नाट्य संस्थेची निर्मिती असून रवींद्र सातपुते या नाट्याचे दिग्दर्शन करीत आहेत. इतिहास व सांस्कृतिक विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका विनीता तेलंग यांनी आनंदमठ कादंबरीचे मराठी नाट्यरूपांतर केले आहे. ज्येष्ठ संवादिनीवादक तसेच संगीतकार अजय पराड यांनी या नाटकाचे संगीत दिग्दर्शन केले आहे. ओंकार कपलाने, वज्रांग आफळे, बद्रिश कट्टी, अनुष्का आपटे, शर्व कुलकर्णी, अनुजा जोशी, प्रसाद कुलकर्णी, संचिता जोशी, ईशान जबडे, पार्थ बापट, श्रीशैल शेलार, शार्दुल निंबाळकर, सिद्धांत गवारे, अमित नगरकर हे युवा कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

Previous Post

पुणे मेट्रोने स्थानकावर मातृशक्ती नर्सिंग पॉड

Next Post

गझलकाराने ‌‘गझल‌’-‌‘गजल‌’ शब्दोच्चाराच्या वादात अडकू नये : भूषण कटककर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Business, Small Business (1)
  • Untitled (14)
  • आरोग्य (26)
  • कृषी (19)
  • क्राईम (22)
  • क्रीडा (24)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (40)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (93)
  • राजकारण (49)
  • राज्य (93)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved