• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Monday, March 2, 2026
The Dhakka
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Monday, March 2, 2026
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जिंकले‘उत्कर्ष २०२५’चे विजेतेपद

The Dhakka by The Dhakka
January 26, 2026
in मनोरंजन
0

  • जगन्नाथ शिंदे ‘गोल्डन बॉय’, तर अंजली जाधव ठरली ‘गोल्डन गर्ल’
  • जल्लोषपूर्ण कार्यक्रमात ‘उत्कर्ष २०२५’ची सांगता

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मंगळवारी ‘उत्कर्ष २०२५’च्या सर्वसाधारण विजेतेपदावर पुन्हा एकदा आपली मोहोर उमटवली. पुणे विद्यापीठाचा जगन्नाथ शिंदे हा यंदाच्या ‘उत्कर्ष’चा ‘गोल्डन बॉय’ ठरला, तर पुणे विद्यापीठाचीच अंजली जाधव हिने ‘गोल्डन गर्ल’चा किताब पटकावला. पुणे विद्यापीठाच्या संघाने या स्पर्धेतील नृत्य, नाट्य, संगीत, साहित्य व ललित कला या सर्व कलाप्रकारांसाठीची सर्वसाधारण विजेतेपदेही जिंकली. त्याखालोखाल विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी नोंदवित सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संघाने स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले.

राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने यंदा विद्यापीठामध्ये १५ व्या ‘उत्कर्ष’ सामाजिक-सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत नृत्य, नाट्य, संगीत, साहित्य आणि ललित कला यांसह पथसंचलन आणि कार्यप्रसिद्धी अहवाल या विभागांमधील एकूण १३ कलाप्रकारांमध्ये राज्यभरातून आलेल्या २७१ कलाकारांनी आपली कला सादर केली. गेले तीन दिवस विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, संत नामदेव सभागृह, इरावती कर्वे सामाजिक शास्त्र संकुल सभागृह आणि पोतदार संकुल या ठिकाणी झालेला विविध कलाप्रकारांच्या सादरीकरणाच्या आधारे या स्पर्धांचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. त्यातून याही स्पर्धेतील पुणे विद्यापीठाचा दबदबा निर्विवादपणे सिद्ध झाला.

विद्यापीठाच्या इरावती कर्वे सामाजिक शास्त्र संकुलामध्ये कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे महाराष्ट्र व गोवा राज्याचे क्षेत्रीय संचालक अजय शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. सोलापूर विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. राजेंद्र वडजे, पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. धोंडीराम पवार, बागेश्री मंठाळकर, डॉ. संदीप पालवे, वित्त व लेखा अधिकारी चारुशीला गायके, सिनेट सदस्य कृष्णा भंडलकर, अधिष्ठाता डॉ. संजय तांबट, विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सदानंद भोसले, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजित कुलकर्णी आदी मान्यवर या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. शिंदे यांनी या वेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेत, त्या आधारे राज्यभरातील स्वयंसेवकांनी वैयक्तिक तसेच सामाजिक विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावण्याचे आवाहन केले. तर, अशा स्पर्धांमधून सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी या पुढील काळात देशाचे सांस्कृतिक दूत म्हणून जबाबदारी उचलण्याची अपेक्षा व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.

स्वामीराज भिसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. भोसले यांनी आभार मानले.

Previous Post

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे  पुरस्कारची घोषणा

Next Post

बांबूशी निगडित व्यवसायामुळे सेवा क्षेत्रात मोठी रोजगार संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Business, Small Business (1)
  • Untitled (14)
  • आरोग्य (26)
  • कृषी (19)
  • क्राईम (22)
  • क्रीडा (24)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (40)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (93)
  • राजकारण (49)
  • राज्य (93)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved