शालेय विद्यार्थी, आश्रमातील बालकांनी अनुभवले ‘छावा’ चे शौर्य !
पुणे:छोटे व्यावसायिक असोसिएशन तुळशीबाग,तुळशीबाग परिवाराकडून शेठ हिरालाल सराफ प्रशाला आणि स्वाधार मोहर आश्रमातील बालकांना ‘छावा’ हा चित्रपट आर डेक्कन चित्रपट गृहात २० फेब्रुवारी रोजी दाखवण्यात आला.धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श नव्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हा उपक्रम करण्यात आला.
या मुलांबरोबर कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने,पुणे शहर हॉकर्स आघाडी अध्यक्ष सागर दहीभाते , सूरज दवे, अरविंद तांदळे, बिरजू ननावरे, परमेश्वर पवार, सोपान उमाजी, प्रविण सोनार,सिद्धार्थ ठक्कर,प्रतीक ओझा उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना भगव्या टोप्या तसेच,
महाराजांच्या जीवनावर आधारित रयतेचे राजे हे पुस्तक भेट देण्यात आले.
आमदार हेमंत रासने म्हणाले,’छत्रपती संभाजी महाराज हे संपूर्ण हिंदू समाजाच्या अस्मितेचे प्रतिक आहेत. त्यांच्या पराक्रमाची, त्यागाची आणि धर्मरक्षणाच्या महान लढ्याची शिकवण प्रत्येक हिंदुस्थानी मुलापर्यंत पोहोचावी, यासाठीच हा उपक्रम राबवण्यात आला ‘. यावेळी सागर दहीभाते म्हणाले मुलांना केवळ चित्रपट दाखवणे एवढाच उद्देश नसून, संभाजी महाराजांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन त्यांच्या मनात राष्ट्रभक्ती, धर्मनिष्ठा आणि स्वाभिमान रुजवण्याचा प्रयत्न आहे.संभाजी महाराजांची गाथा ऐकताना अंगावर काटा येतो, आणि तीच भावना या मुलांच्या मनातही रुजावी, यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे.
……..