शर्वाय इंजिनियरिंग प्रायव्हेट लिमिटेडची 2 कोटी 6 लाख रुपयांची रक्कम फसवणून
बावधन:पुण्यातील बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन कोटी सहा लाख रुपयांच्या कंत्राटी कामात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलाय.BNC पावर प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीकडून एकाच कामाची परचेस ऑर्डर दोन कंपन्यांना देऊन शर्वाय इंजिनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड 2कोटी 6 लाख रुपयांना फसवल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत बावधन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला असून या प्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे…
भोसरीतील उपकेंद्रातून यशवंत नगर चौक दरम्यान 220kv भूमिगत केबल टाकण्याचे कामाचा ठेका एका मोठ्या कंपनी कडून BNC पावर प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडने ठेका मिळवला हे काम पूर्ण करण्यासाठी शर्वाय इंजिनियरिंग प्रायव्हेट लिमिटेडशी करार करुन शर्वाय इंजिनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड लायसन्सचा वावर करुन काम सुरु केलं..दरमान BNC पावर प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड तुमच्या कामात मयुर साखरे यांना सिव्हिल काम द्या यासाठी दबाव आणला त्यांना या कामात भागीदार करण्यासाठी सांगितले.. काम पुढे गेल्यामुळे मजबुरीत शर्वाय इंजिनियरिंग प्रायव्हेट लिमिटेडने मयुर साखरेना सोबत घेतले..भोसरीतील उपकेंद्रातून यशवंत नगर चौक दरम्यान 220kv भूमिगत केबल टाकण्याचे काम पूर्ण होत असताना BNC पावर प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडने शर्वाय इंजिनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड नोटीस पाठवून काम थांबायला सांगितले व याच कामाचे सीताई इंटरप्राईजेस चे मयूर साखरे यांना परचेस ऑर्डर दिली BNC पावर प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडने एकच कामाचे दोन कंपन्यांना परचेस ऑर्डर दिल्या.शर्वाय इंजिनियरिंग प्रायव्हेट लिमिटेडची 2 कोटी 6 लाख रुपयांची रक्कम फसवणून केली..या प्रकरणात शर्वाय इंजिनियरिंग प्रायव्हेट लिमिटेडचे संचालकांना तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिले .. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील बावधन पोलिस ठाण्यात शर्वाय इंजिनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड निखिल राय यांनी आरोपी राजेश प्रकाश चौधरी, गिरीश भागवत चौधरी यशोधन नामदेव चौधरी नामदेव मारुती निकम जितेंद्र गरुड निलेश मतकर आणि सीताई इंटरप्राईजेस चे मयूर साखरे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. मिथेलिष राय ,फिर्यादी कंपनी संचालक यांनी याबाबत पोलिस आयुक्तांची भेट घेतली आहे कारवाई करण्याची मागणी केली.