शिवजयंत्ती निमित्त मुस्लिम मावळ्यांकडून पुण्यातील कोंढव्यात राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन

शिवजयंती सोहळ्याचे आयोजन मुस्लिम मावळा फाउंडेशन केलं

पुणे:आज पुण्यातील कोढवा येथे मुस्लिम मावळा फाउंडेशनच्या वतीने सर्वधर्मीय शिवजयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता .यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा देत अतिशय भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती .यामध्ये मुस्लिम समाजातील युवक ,महिला व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .या शिवजयंती सोहळ्याचे आयोजन मुस्लिम मावळा फाउंडेशनचे हाजी गफूर पठाण यांनी केले होते . सर्व धर्मियांना समान न्याय देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मुस्लिम मावळे आहोत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.सालाबादप्रमाणे यावर्षीही श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला वंदन करुया आणि त्यांच्या विचारांना उजाळा देऊया .आणि शिवाजी महाराजांची सर्वधर्म समभावाचे विचार समजापर्यंत पोहचणे गरजेचे असल्याचे मत यावेळी आयोजक मुस्लिम मावळा फाउंडेशन चे हाजी गफूर पठाण यांनी व्यक्त केले .

Exit mobile version