• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Monday, March 2, 2026
The Dhakka
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Monday, March 2, 2026
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

रत्नागिरी येथे शनिवारी महाराष्ट्र अंनिसच्या राज्य कार्यकारणीची बैठक

The Dhakka by The Dhakka
January 26, 2026
in राज्य
0


रत्नागिरी येथे शनिवारी महाराष्ट्र अंनिसच्या राज्य कार्यकारणीची बैठक

  • राज्यभरातून कार्यकर्त्यांची उपस्थिती.
  • कामाचा आढावा आणि पुढील सहा महिन्यांच्या कामाचे नियोजन होणार!

प्रतिनिधी :
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारणी बैठक रत्नागिरी येथे शनिवार दि.१ आणि रविवार दि.२ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक ओंकार मंगल कार्यालय, गांजुर्डा, शिरगाव रत्नागिरी येथे दोन दिवस संपन्न होईल अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारणी सदस्य मुक्ता दाभोलकर, विनोद वायंगणकर,राधा वणजू , राहुल थोरात, अण्णा कडलास्कर यांनी दिली.

या राज्य कार्यकारणी बैठकीमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मागील सहा महिन्यांच्या विभागवार कामाचा आढावा घेऊन पुढील सहा महिन्यांच्या कामाचे नियोजन करण्यात येईल. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र विभाग, अंनिस प्रकाशन विभाग, प्रशिक्षण विभाग, सोशल मीडिया विभाग, महिला विभाग, आंतरजातीय विवाह सहाय्य विभाग, मानसिक आरोग्य विभाग, बुवाबाजी संघर्ष विभाग या व इतर विभागांच्या कामकाजावर चर्चा होईल.

या बैठकीसाठी राज्यभरातून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य पदाधिकारी डॉ. हमीद दाभोलकर, दिपक गिरमे, मिलिंद देशमुख, अण्णा कडलास्कर, नंदिनी जाधव, रामभाऊ डोंगरे, सम्राट हटकर, प्रवीण देशमुख, गणेश चिंचोले इ. सह, जिल्हा पदाधिकारी आणि शाखा पदाधिकारी तसेच क्रियाशील कार्यकर्ते असे मिळून सुमारे दीडशे लोक उपस्थित राहणार आहेत.

बैठकीचे उद्घाटन शनिवार दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता समाजवादी कार्यकर्ते आणि नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांच्या हस्ते आणि क्रेडाई रत्नागिरीचे अध्यक्ष नित्यानंद भुते यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. त्यानंतर दुपारी १२ ते सायं. ७ पर्यंत अंनिसने मागील सहा महिन्यात केलेल्या कामाचे राज्य आणि जिल्हा अहवाल सादरीकरण करण्यात येईल.

सायं. ८ वा रत्नागिरी येथील प्रसिद्ध जादूगार विनयराज यांचे जादूचे प्रयोग सादर होतील व त्यानिमित्ताने बुवाबाजी भांडाफोड बद्दल चर्चा होईल.

या बैठकीचा समारोप रविवारी २ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वा. रत्नागिरी आकाशवाणी चे कार्यक्रम अधिकारी सुहास विद्वांस, रत्नागिरी शासकीय फिशरीज कॉलेज चे प्रा. डॉ. केतन चौधरी यांच्या उपस्थितीत होणार आहे. समारोपप्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने पाच महत्त्वपूर्ण ठराव मंजूर केले जाणार आहे.

कार्यक्रमाचे संयोजन रत्नागिरी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते विनोद वायंगणकर, राधा वणजू,जयश्री बर्वे, वल्लभ वणजू,अनिश पटवर्धन, मधुसूदन तावडे हे करीत आहेत.

Previous Post

माईर्स एमआयटी डब्ल्यूपीयू व एडीटीतर्फे ‘वंदन भारतमातेला’ आयोजन

Next Post

तोरणा गडाच्या पायथ्याशी बिबट्याने शेळी केली ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Business, Small Business (1)
  • Untitled (14)
  • आरोग्य (26)
  • कृषी (19)
  • क्राईम (22)
  • क्रीडा (24)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (40)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (93)
  • राजकारण (49)
  • राज्य (93)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved