• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Monday, March 2, 2026
The Dhakka
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Monday, March 2, 2026
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

सोमवारी पुण्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेची राज्यव्यापी बैठक..

The Dhakka by The Dhakka
January 26, 2026
in राज्य
0

रविकांत तुपकर यांची आहे क्रांतिकारी शेतकरी संघटना

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर होणार मंथन; रविकांत तुपकरांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष..मोठ्या आंदोलनाची शक्यता..

पुणे :
क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या बुलढाण्यात झालेल्या वादळी बैठकीनंतर आता पुण्यात राज्यव्यापी बैठक होऊ घातली आहे. या बैठकीत राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्या आणि एकंदरीत शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत विचार – मंथन केले जाणार आहे. पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाणार असून शेतकरी यावेळी नव्या आंदोलनाची घोषणा देखील करू शकतात, त्यामुळे ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असून या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष राहणार आहे.

शेतकऱ्यांचे नेते रविकांत तुपकर यांची मुलुख मैदानी तोफ सोमवार 3 मार्च रोजी पुण्यात धडाडणार आहे. श्रमिक पत्रकार भवन, गांजवे चौक,नवी पेठ पुणे येथे सकाळी नऊ वाजता ही बैठक सुरु होणार आहे. या राज्यव्यापी बैठकीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्रमुख पदाधिकारी आणि महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतकऱ्यांच्या हक्काचा पिकविमा, सोयाबीन- कापूस भावफरक, नाफेड मध्ये अडकलेली शेतकऱ्यांची रक्कम, रखडलेले अनुदान, ऊस, कांदा, दूध यासह इतर विषयांवर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. राज्यभरातील शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत आहे, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एकत्रितपणे लढा देण्याची गरज आहे त्याच अनुषंगाने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी या बैठकीचे आयोजन केले असून त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरातील प्रमुख शिलेदार पुण्यात पोचणार आहेत. शेतकऱ्यांच्या विविध मागणी आणि समस्यांबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाणाची शक्यता आहे. राज्यात मोठे आंदोलन छेडणार असा इशारा यापूर्वीच रविकांत तुपकर यांनी दिलेला आहे, त्यामुळे पुण्यात होणाऱ्या या राज्यव्यापी बैठकीत रविकांत तुपकर नेमके काय बोलतात आणि कोणत्या आंदोलनाची घोषणा करतात व काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. शिवाय क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या राज्याच्या कोअर कमिटीची तसेच प्रदेशाध्यक्ष व इतर महत्त्वपूर्ण पदांच्या नियुक्तीची घोषणा देखील रविकांत तुपकर या बैठकीत करणार आहेत. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा पहिला प्रदेशाध्यक्ष म्हणून कोणाची वर्णी लागते याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे. महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी रविकांत तुपकर यांनी राज्यभर चळवळ मजबूत करण्याचा निर्धार केला असून त्यासाठी ते आता प्रमुख पदाधिकारी म्हणून कोणत्या कोणत्या शिलेदारांची निवड करतात हे तीन मार्च रोजी सर्वांसमोर येणारच आहे.

Previous Post

थकीत बिले मिळण्यासाठी ठेकेदारांचे आंदोलन..

Next Post

गायक रोहित राऊत आणि गायिका सोनाली सोनवणेच्या मधुर आवाजातील ‘दर्याचं पाणी’ कोळी गीत प्रदर्शित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Business, Small Business (1)
  • Untitled (14)
  • आरोग्य (26)
  • कृषी (19)
  • क्राईम (22)
  • क्रीडा (24)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (40)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (93)
  • राजकारण (49)
  • राज्य (93)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved