समाजाला गुन्हेगारीचा जो ठपका पडला आहे त्याच नजरेतून समाजाकडे पाहू नका
पुणे :पुण्यातील हडपसर भागामध्ये शिखलीकर समाजाच्या वतीने समाज मेळाव्याचा आयोजन करण्यात आलं होतं. अनेक वर्ष हा समाज मुख्य प्रवाहापासून वंचित आहे. सिक शीखलीकर समाजासाठी एक नवीन महामंडळ सुरू करण्यात यावा अशी मागणी सरकारकडे करण्यात आली.
यामध्ये समाजातील कुटुंबांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होण्यासाठी चार एकर जमीन उपलब्ध करून द्यावी, लोखंडी साहित्य बनवण्याचा व्यवसाय बंद पडल्याने त्यांना नवीन उद्योगाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, उद्योग-व्यवसायासाठी कर्ज द्यावे, राहण्यासाठी घरकुल बांधून द्यावे.समाजातील ज्या विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी सरकारने पेन्शन सुरू करावी, त्याचबरोबर पुण्यात एक भव्य सांस्कृतिक भवन उभा करावं, पुणे जिल्ह्यात ज्या ठिकाणी सरकारी जमीन आहे त्या जमिनीवर एक समाजासाठी मोठा गुरुद्वारा बांधण्यात यावा. समाजातील काही लोकांमुळे समाजाला गुन्हेगारीचा जो ठपका पडला आहे त्याच नजरेतून समाजाकडे पाहू नये. अशा विविध मागण्यांसाठी राज्यभरातून अनेक समाजातील लोक या मेळाव्यासाठी उपस्थित होते.
या बैठकीला पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष पवित्र सिंग बोंड, सागर सिंग टाक, नेहल भादादा, दिलवाल दुधानी, अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.