पुणे
एका नामांकित कंपनीची गोपनीय माहिती चोरी करुन दुसऱ्या कंपनीच्या कामासाठी वापरल्यापरकरणी पुणे सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुशोभन सरकार असे त्याचे नाव आहे. कॅटलिस्ट सर्व्हिसेस सोलुशन् सपार्टनर नावाची ही कंपनी आहे. या कंपनीतील माहिती सरकार याने चोरी करुन वापरी आहे. सरकार हा पुर्वी या कंपनीत चिफ ग्रोथ ऑफिसर म्हणून काम करत होता. सरकार याने कंपनीतील आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यानच्या काळात काही इतर लोकानी देखील राजीनामे दिले. त्यामुळे कंपनीने याबाबत माहिती घेतली. तसेच सरकार कंपनीत वापरत असलेल्या लॅपटॉपचे फोरेन्सिक विश्लेषण केले त्यावेळी हा प्रकार समोर आला.कॅटलिस्ट सर्व्हिसेस सोलुशन् सपार्टनर नावाची ही कँटिन सेवा, कर्मचाऱ्यांच्या खानपणाची वेवस्था, नाश्त पुरविण अशी कामे करते. भारतात या कंपनीची १२० युनिट्स असून, ५ हजाराच्या घरात कर्मचारी अहेत.याबाबत सचिन शिवाजीराव देसाई ( रा. पाटीलनगर, बालेवाडी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी सुशोभन सरकार (रा. काळेवाडी रोड, टोपाज पार्क, काळेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ६ एप्रिल २०२० ते ४ नोव्हेबर २०२३ दरम्यान बालेवाडी येथील कॅटॅलिस्ट सर्व्हिसेस सोल्युशन्स पार्टनर्स या कंपनीमध्ये घडला आहे.कंपनीतील चीफ ग्रोथ ऑफिसर सुशोभन सरकार याने अचानक २८ एप्रिल २०२३ रोजी ई मेल करुन राजीनामा दिला. त्यानंतर जनरल मॅनेजर योगेश दुधाने याने राजीनामा दिला. पाठोपाठ मनिष जीरगळे, शशांक गुप्ते, अमोल गुर्जर यांनी राजीनामा दिला. प्रशासन व विमा विभागातील कर्मचारी ललित मालपे यानेही राजीनामा दिला. परंतु, कंपनीत काही बेकायदेशीर गोष्टी घडल्याचे निदर्शनास आल्याने व मालपे याने केलेल्या आर्थिक फसवणुकीच्या बाबीमुळे त्याचा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही. कंपनीने या अधिकारी आणि कर्मचारी यांना लॅपटॉप वापरण्यासाठी दिले होते. राजीनामा देताना त्यांनी ते परत केले. तेव्हा त्यांच्या लॅपटॉपची फॉरेन्सिक चाचणी मॅग्रेट फॉरेन्सिक एक्झामिनेशर रिपोर्ट या तज्ञांकडे तपासणीसाठी दिले.
त्यात ललित मालपे व मनिष जिरगळे हे दोघे कंपनीत काम करत असताना कंपनी सोडून गेलेल्या सुशोभन सरकार ज्या अॅक्सॉन कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया (मालाड, मुंबई) या नवीन कंपनीमध्ये कार्यरत होता. त्या कंपनीसाठी माहिती संकलन करण्याचे तसेच गोपनीय माहिती गोळा करत असल्याचे दिसून आले. सुशोभन सरकार याच्या लॅपटॉपच्या तपासणीमध्ये त्याने कंपनीच्या ई मेल आयडीवरुन त्याच्या वैयक्तिक ई मेल आयडीचा वापर केल्याचे दिसून आले. त्यामध्ये कॅटलिस्ट सर्व्हिसेस सोल्युशन्स पार्टनर्स कंपनीची महत्वाची माहिती, अॅग्रीमेंट, ध्येय धोरणे, प्रोडक्ट ब्राँडीग मटेरियल, कंपनीचा वार्षिक व मासिक खर्च, ताळेबंद, युनिट जमा खर्च इत्यादी गोपनीय व संवेदनशील माहिती त्याचे वैयक्तिक अॅपल क्लाऊड स्टोरेजवर चोरुन फॉरवर्ड केल्याचे दिसून आले. सुशोभन सरकार याने कंपनीची गोपनीय माहिती कंपनीचे नॉन डिस्क्लोजर अॅग्रीमेंटचा भंग करुन हस्तगत केली व त्याद्वारे अॅक्सॉन कॉर्पोरेट सर्व्हिसेस कंपनीसाठी प्रशासकीय कामे करुन कंपनीची फसवणूक करुन आर्थिक नुकसान केले आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील शिंदे तपास करीत आहेत.