बिबट्याने बंगल्यासमोरून राखणदार कुत्र्यावर हल्ला करत ठार केले
जवळे :येथील सरपंच वृषाली उत्तम शिंदे पाटील यांच्या बंगल्यासमोरून बिबट्याने राखणदार कुत्र्यावर बुधवार (ता.०५) रोजी पहाटे पावणे तीन वाजता हल्ला करत ठार केले,या घटनेचा व्हिडिओ सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.जवळे परिसरात बिबट्याची दहशत वाढली असून येथील नागरिकांना बिबट्याचे रोज दर्शन होत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.जवळे येथील सरपंच वृषाली उत्तम शिंदे पाटील यांचा थापलिंग रस्त्याच्या कडेला बंगला आहे.बुधवारी पहाटे पावणेतीन वाजता बिबट्याने बंगल्यासमोरून राखणदार कुत्र्यावर हल्ला करत ठार केले आणि बाजूच्या शेतात ओढून नेले,हे दृश्य त्यांच्या घरच्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.अशा प्रकारे बिबट्याची दहशत वाढली असून वनविभागाने तातडीने पिंजरा लाऊन बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.