शब्दगंध संमेलनाच्या, सुत्र संचालक व समन्वयकांची बैठक संपन्न.
अहिल्यानगर :कोणत्याही कार्यक्रमांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी सूत्रसंचालक अत्यंत महत्त्वाचा घटक असून त्यामुळेच कार्यक्रम उठावदार होऊ शकतो, त्यासाठी सूत्रसंचालकांनी आपली भूमिका व्यवस्थितपणे निभावणे आवश्यक आहे असे मत नवजीवन प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने संमेलनाच्या नियोजना बाबतची बैठक नुकतीच संस्थापक सचिव सुनील गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली वॉरियर्स प्री प्रायमरी स्कूल मध्ये पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. शब्दगंधच्या सहसचिव स्वाती ठुबे, नियोजन समिती प्रमुख बबनराव गिरी, जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र चोभे, राज्य कार्यकारणी सदस्य शर्मिला गोसावी, प्रशांत सूर्यवंशी, मारुती सावंत, मेट्रो न्युज चे मकरंद घोडके, प्रसाद भडके, शर्मिला रणधीर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
शब्दगंध चे तत्कालीन सदस्य, प्राचार्य हिराचंद ब्राह्मणे यांच्या स्मृति प्रित्यर्थ पुरस्कार देण्यात येणार असून यावर्षीचा पहिलाच पुरस्कार बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक, शब्दगंध चे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.शंकर चव्हाण यांना तर के.डी. सातपुते स्मृती पुरस्कार सेवानिवृत्त अभियंता किशोर डोंगरे यांना जाहीर करण्यात येत. कार्यकर्त्यांमधून शब्दगंधचा उत्कृष्ट युवा गौरव पुरस्कार ऋषिकेश राऊत यास जाहीर करण्यात येतं आहे. सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनातील कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काव्य संमेलन – चंद्रकात पालवे व मारुती सावंत, शाहिरी जलसा – भगवान राऊत,उद्घाटन समारंभ – राजेंद्र उदागे, सुनील गोसावी, एकपात्री प्रयोग – वर्षा भोईटे, काव्यसंमेलन दुसरे – राजेंद्र पवार, बबनराव गिरी, परिसंवाद प्रा.डॉ. तुकाराम गोंदकर, कथाकथन – प्रशांत सूर्यवंशी, स्पर्धा पारितोषिक प्रा.डॉ.संजय दवंगे, चर्चासत्र – प्रा.डॉ.अशोक कानडे,समारोप समारंभ – राजेंद्र चोभे,गझल संमेलन – राजेंद्र फंड इत्यादी कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली.
संमेलनाच्या यशस्वीतेसाठी स्वागताध्यक्ष संपतदादा बारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्या स्थापन करण्यात येतं आहेत.यावेळी नवजीवन प्रतिष्ठान च्या वतीने सर्व युवा कार्यकर्त्यांना डायऱ्यांचे वितरण करण्यात आले.
शेवटी कवी मारूती सावंत यांनी आभार मानले.