मुंबईत रस्ते स्कॅम झालय, आणि आयुक्तांनी ते एक्सपोज केलय
मुंबई :शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, मा. आमदार श्री आदित्यजी ठाकरे यांची आज शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद पार पडली . या पत्रकार परिषदेतून मुंबई महानगर पालिकेच्या २०२५-२६ या वर्षाच्या अर्थसंकल्पावर माध्यमांशी संवाद साधला . यावेळी केंद्राच्या बजेटमध्ये सुद्धा महाराष्ट्रला काही मिळालं नाही . आणि भाजप कडून मुंबईची पिळवणूक होतेय . असं आदित्य ठाकरे म्हणाले .
आजच्या बजेटवर बोलताना आदित्य ठाकरे यांनी एका शायरीचं उदाहरण म्हटली. बहुत हैं मगर खुलासा कौन करे, मुस्कुरा देता हूँ यूँ ही तमाशा कौन करे..!!आज सोशल मीडियावर ही शायरी वाचली, जी बजेट नंतर तंतोतंत बरोबर वाटते . असं आदित्य ठाकरे म्हणाले.
झोपडपट्टीतील दुकानावर कर लावला जाणार हाच ‘अडाणी’ कर – आदित्य ठाकरे आजच्या अर्थसंकल्पात झोपडपट्टी दुकानावर कर लावला जाणार असल्याचं म्हटलं आहे . ही धक्कादायक बाब आहे . झोपडपट्टीतील दुकानावर कर लावला जाणार हाच अदानी कर आहे. कारण धारावीतून दुकान यामुळे खाली होतील . कारण त्यांच्यावर कर लावला जातोय . आज झोपडीतील दुकानावर कर लावला जातोय, आता लवकरच झोपडपट्टीतील घरावर सुद्धा कर लावला जाईल . हा अदानी कर नाही तर काय ? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला . तसेच कचरा संकलनवरसुद्धा कर लावण्याचा प्रस्ताव आहे . देवनार डम्पिंग ग्राउंड साफ करायला मुंबई महापालिका खर्च करणार आहे . कारण ती जमीन अदानी प्रकल्पला दिला जाणार आहे . अदानीचा साडे ७ हजार कोटी रुपयाचा प्रीमियम अजून महापालिकाला भरला नाही त्याचा उल्लेख यामध्ये नाही . असंही आदित्य ठाकरे म्हणाले .
मुंबईत रस्ते स्कॅम झालाय, आणि आयुक्तांनी ते एक्सपोज केलय – आदित्य ठाकरे मुंबईतल्या रस्त्यांसंदर्भात आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की '२०२३ मध्ये पत्रकार परिषद घेतली आणि रस्त्याचा घोटाळा होणार सांगितलं होतं . आणि तेच तंतोतंत घडतय. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे म्हणाले होते २ वर्षात मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त करू .
फक्त २६ टक्के रस्त्याच काम पूर्ण झालय हे समोर आलय . रस्ते स्कॅम झालाय , आणि शिंदेंच्या निर्णयाला आयुक्तानी एक्सपोज केलय . त्यामुळे MSRDC ४ हजार कोटी मुंबई महापालिकेला देणार आहे का ? नगरविकास खात उपमुख्यमंत्रीकडे असेल तरी आम्ही त्याच्यात पारदर्शकता आणावी अशी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी करणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले .