विदर्भ संशोधन मंडळ यांच्या वतीने हा पुरस्कार
पुणे :पुण्यातील ज्योतिष अभ्यासक कैलास केंजळे आणि सौ.गौरी केंजळे यांना ज्योतिष क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘रोटरी सन्मान-२०२५’जाहीर झाला आहे.रोटरी क्लब ऑफ नागपूर इलाईट, रोटरी क्लब ऑफ नागपूर एन्कलेव्ह,रोटरी क्लब ऑफ नागपूर व्हिजन, रोटरी क्लब ऑफ नागपूर नॉर्थ,विदर्भ संशोधन मंडळ यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
दि.३ मार्च २०२५ रोजी सायंकाळी पावणे सात वाजता विदर्भ संशोधन मंडळ येथे हा कार्यक्रम होणार आहे.प्रांतपाल रजिंदरसिंग खुराणा यांनी ही माहिती दिली.याच कार्यक्रमात उभयतांची ‘विस्मयकारक ज्योतिष विश्व ‘ या विषयावर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.कैलास केंजळे आणि गौरी केंजळे हे गौरीकैलास ज्योतिष संस्थेचे संस्थापक असून या क्षेत्रात ३ दशकाहून अधिक काळ कार्यरत आहेत.
—
………………………………………………