• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Monday, March 2, 2026
The Dhakka
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Monday, March 2, 2026
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

नैतिकतेची लढाई गांधी विचारांशी ठाम राहून लढली पाहिजे’ : खा.सुळे

The Dhakka by The Dhakka
January 26, 2026
in राजकारण
0

म. गांधी पुण्यतिथीदिनी सामुदायिक प्रार्थना,भजन,व्याख्यान

गांधीभवन येथे खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थिती
……………

‘नैतिकतेची लढाई गांधी विचारांशी ठाम राहून लढली पाहिजे’ : खा.सुळे

पुणे:राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे गुरुवार,दि.३० जानेवारी २०२५ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी साडेआठ वाजता सामुदायिक प्रार्थना,भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.खासदार सुप्रिया सुळे, गांधी स्मारक निधीचे विश्वस्त डॉ. शिवाजीराव कदम, अॅड.अभय छाजेड,एम.एस.जाधव, अन्वर राजन, डॉ.लक्ष्मीकांत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.खा.सुळे यांनी आणि उपस्थित मान्यवरांनी महात्मा गांधी यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण केला.संदीप बर्वे,धनंजय पवार, मोहिनी पवार, बाबालाल बिडीवाले,अभय देशपांडे यांनी भजन गायन केले.सभागृहात प्रा.रमा सप्तर्षी,डॉ.सुनील जगताप,विकास लवांडे, अॅड.स्वप्नील तोंडे, दत्ता बाळसराफ, अॅड.राजेश तोंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी आदरांजली सभा आयोजित करण्यात आली .या सभेनंतर ‘गांधीजी आणि सहिष्णुता’ या विषयावर माजी साहित्य संमेलनाध्यक्ष तसेच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त डॉ.लक्ष्मीकांत देशमुख यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले .हे कार्यक्रम गांधी भवन(कोथरूड) येथे पार पडले.

नैतिकतेची लढाई गांधी विचारांशी ठाम राहून लढली पाहिजे’ : खा.सुळे
…………….

प्रार्थनेनंतर बोलताना खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या,’ महात्मा गांधी पुढील पिढीला कळले पाहिजेत,नव्या पिढीला त्यांच्या भाषेत पोहोचवले पाहिजेत.त्यांचा किमान एक गुण अंगात बाणवला पाहिजे.प्रार्थना ही वैय्यक्तिक बाब आहे.तशीच राहिली पाहिजे.आजही देशाला गांधी, विनोबांच्या विचारांची गरज आहे.

कॉ. गोविंद पानसरेंचे खुनी जामीनावर सुटलेत. गौरी लंकेश, डॉ.दाभोळकर यांच्या बाबतीत काय झाले,हे आपण पाहिले आहे.श्रद्धा जरूर असावी, अंधश्रध्देने सर्वांचा नाश होतो, महिला मागे पडतात.आमची श्रध्दा पांडुरंगावर आहे,त्यांच्या आणि आमच्या भेटीत आम्हाला मध्यस्थ लागत नाही.

सद्यस्थितीवर बोलताना खा. सुळे म्हणाल्या,’कै.संतोष देशमुख यांच्या मुलीचे अश्रू बघवले नसते. आज काही जणांच्या मांडीला मांडी लावून बसू शकलो नसतो.पक्षाचे विभाजन झाले, हे बरेच झाले.आता सत्ताधारी म्हणतात,आम्हाला नैतिकता शिकवू नका. देशात,राज्यात वातावरण अत्यंत बिघडले आहे.नैतिकतेची ही लढाई सातत्य ठेवून, विचारांशी ठाम राहून लढली पाहिजे’.

गांधी विचार प्रसाराचा खा.सुप्रिया सुळे यांचा संकल्प
…………………………………..

खा.सुळे यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण केला.त्या म्हणाल्या,’गांधी भवन ही वास्तू प्रत्येक पुणेकराचे घर,माहेर झाले पाहिजे. माझ्याशी संबंधित शाळांमध्ये,रयत शिक्षण संस्थेत गांधीजींच्या प्रार्थना होतील,याचा मी प्रयत्न करणार आहे.

वर्षातून गांधी भवन येथे ६ कार्यशाळा घेऊन गांधी विचाराचे १ हजार कार्यकर्ते घडवले पाहिजेत,असा संकल्प खा.सुप्रिया सुळे यांनी केला.दत्ता बाळसराफ,विकास लवांडे यांच्यावर नियोजनाची जबाबदारी दिली.या कार्यशाळांना खा. सुळे उपस्थित राहणार आहेत.

गांधीजींचे न ऐकता शहरात येऊन आपण शहरे बकाल केली आहेत.गांधी, नेहरूंचे सायंटिफिक टेंपर, विज्ञानविचार आचरणात आणले पाहिजेत. संविधानाच्या चौकटीत राहून समाजात बदल घडवले पाहिजेत, असेही खा. सुळे यांनी सांगितले.

प्रत्येक पायरीवर स्वार्थाची चेंगराचेंगरी : डॉ. सप्तर्षी
………..

डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले’, गांधीजींच्या प्रार्थना हे बीजारोपण आहे.त्यांचे स्मरण हे राष्ट्रपित्याचे स्मरण आहे. गांधीजींनी आयुष्यात कधीही प्रार्थना चुकवल्या नाहीत. गांधींजींचा खून करणारा खुनी पुण्यातील उच्चकालीन असणे हा निव्वळ योगायोग नाही.त्यामुळेच महाराष्ट्रात,पुण्यात गांधी विचार जिवंत ठेवला पाहिजे.गांधी स्मारक निधीची स्थापनाच या उद्देशाने झाली आहे. गांधी विचारांचे बीज आम्ही सांभाळून ठेवले आहे.त्याचा प्रसार करण्याची जबाबदारी सर्वांची आहे.

महाराष्ट्रात प्रत्येक पायरीवर नवीन मंत्रीमंडळ एकमेकाशी भांडत आहे. मंत्रीपद, पालकमंत्री पदासाठी चेंगराचेंगरी होत आहे. कारण पालकमंत्री झालो नाही,तर मोक्ष मिळणार नाही,अशी त्यांना भीती वाटते,अशी टीका डॉ. सप्तर्षी यांनी केली. बंधूभाव असणारे हे राष्ट्र गांधीजींनी घडवले. मगच प्राण सोडले.ज्यांना हिंदूराष्ट्र हवे होते,त्यांनी ते ब्रिटिशांविरुद्ध लढून का मिळवले नाही, असा सवालही डॉ. सप्तर्षी यांनी केला.

Previous Post

मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात सर्वोतोपरी मदत करणार

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयात ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची तपासणी व पडताळणी प्रक्रियेबाबत बैठक संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Business, Small Business (1)
  • Untitled (14)
  • आरोग्य (26)
  • कृषी (19)
  • क्राईम (22)
  • क्रीडा (24)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (40)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (93)
  • राजकारण (49)
  • राज्य (93)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved