एम्प्रेस गार्डनमध्ये भरले रंगेबेरंगी फुलांचे प्रदर्शन आजचा शेवटचा दिवस

एम्प्रेस गार्डनमध्ये भरले रंगेबेरंगी फुलांचे प्रदर्शन प्रदर्शनाचा आजचा शेवटचा दिवस

पुणे :अ‍ॅग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियाच्यावतीने एम्प्रेस गार्डन येथील पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख डॉ. सुहास दिवसे यांच्या हस्ते करण्यात आले. पुष्प प्रदर्शन सुंदर असून हे एम्प्रेस गार्डन मध्ये दिवस सणासारखे साजरे होतात. नवीन फुले, फळे, नवीन तंत्रज्ञान मदतीने नर्सरीचे येथे प्रदर्शन मांडले आहे. ही संस्था निसर्गाचे संवर्धन करण्याचे काम करत ही असून हा वारसा पुढे चालत रहावा. यासाठी नवीन तरुण पिढी येत आहे . ही चांगली गोष्ट आहे.

या पुष्प प्रदर्शनामध्ये जपानी शैलीत बनवलेल्या विविध फुलांच्या सजावटी, विविध प्रकारच्या फुलांच्या रचना आणि स्पर्धकांनी बनवलेल्या विविध प्रकारच्या बोन्साय झाडे तसेच पुण्यासह राज्यातील अनेक नर्सरींचा समावेश आहे. फुलांची कलात्मक मांडणी, फळे व भाजीपाला स्पर्धा, आकर्षक पानांच्या कुंड्या, बागेतील विविध साहित्य ठेवण्यात आले आहे.

पुष्प प्रर्दशनानिमित्ताने पुष्प रसिकांना रंगीबेरंगी फुलांनी सजलेल्या एम्प्रेस गार्डनचा आनंद घेत आहेत. पुष्प प्रदर्शनानिमित्त विविध प्रकारच्या उद्यान रचना, आकर्षक कुंड्यांची मांडणी, विविध पानाफुलांची रचनात्मक मांडणी इ. प्रकार या पुष्पप्रदर्शनाच्या निमित्ताने पुष्परसिकांना लाभ मिळणार आहे.यावर्षी पुष्पप्रदर्शनाच्या निमित्ताने पुण्यातून कोल्हापूर, सांगली, नाशिक, आंध्र प्रदेश, केरळ इ. ठिकाणाहून नर्सरी व्यावसायिक या पुष्पप्रदर्शना मध्ये सहभागी झाले आहेत.हे पुष्प प्रदर्शन २५ जानेवारी ते २७ जानेवारीपर्यंत सकाळी नऊ ते सात वाजेपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार आहे.विविध जातींच्या अडीच लाख फुलांचा प्रदर्शनात समावेश आहे.गावरान हुरडा पार्टीचा लाभ नागरिकांना मिळणार आहे.

Exit mobile version