गांधीचा विचार कधी मरू शकत नाही
विद्यार्थी नेते अॅड. चैतन्य राऊत : महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिम्मित लंडन येथे अभिवादन सभा
पुणे : आम्ही आपला भारत सोडून साता समुद्रापार आलोय तरीही इथे आल्यावर समजत गांधीना किती मारण्याचा पर्यंत केला तरी महात्मा गांधीचा विचार कधी मरत नाही हे लंडनमध्ये आल्यावर समजते, असे प्रतिपादन विद्यार्थी नेते अॅड. चैतन्य राऊत यांनी केले.
लंडन येथील पार्लियामेंट स्ट्रीट चौकात असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुण्यतिथीनिम्मित अभिवादन सभेचे आयोजन भारतीय उच्चायुक्तालय आणि ऑल पार्टी पार्लमेंटरी कमिटी ऑन इंडिया यांनी केले होते. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला उच्चायुक्त श्री. विक्रम दोराईस्वामी, लॉर्ड मेघनाद देसाई, माजी खासदार विरेंद्र शर्मा आणि नव्याने नियुक्त झालेले लॉर्ड कृष्ण रावल, विद्यार्थी नेते अॅड. चैतन्य राऊत उपस्थित होते. या कार्यक्रमाला लंडन मधील विविध विद्यापीठांतील भारतीय विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
राऊत म्हणाले, की ब्रिटिश संसदेसमोर उभा असलेला बापूंचा पुतळा त्यांच्या स्मृतींना उजाळा देतो. बापूंनी दिलेल्या शिकवणी आजही सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर नेण्याचा मूलमंत्र सिद्ध होत आहेत. संपूर्ण जगामध्ये भारताची ओळख ही भगवान बुद्ध आणि महात्मा गांधी यांच्यापासून सुरुवात होते. महात्मा गांधींनी केवळ स्वातंत्र्यलढाच यशस्वी केला नाही तर या जगामध्ये फार मोठा इतिहास घडवणारी एक निशस्त्र क्रांती आणि मानवी जीवनमूल्य सर्वसामान्यांना देऊन मानवतावादाचा, समतेचा, सत्य अहिंसेचा फार मोठा इतिहास रचला असल्याचेही ते म्हणाले.