तुतारीचे पदाधिकारी महिला अत्याचारात आघाडीवर, सुप्रिया ताई कार्यशाळा घेऊन धडे द्या

पुणे : राज्यात सातत्याने वाढत चाललेल्या महिला अत्याचारच्या घटनांवर विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांकडून राज्य महिला बरखास्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. तुतारीचे पदाधिकारी हे महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये आघाडीवर असून खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची कार्यशाळा घ्यावी असा खोचक सल्ला चाकणकर यांनी दिला आहे.


राज्यातील वाढत्या महिला अत्याचा घटनांनंतर राज्य महिला आयोग बरखास्त करा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावर बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, गेल्या तीन वर्षांमध्ये राज्य महिला आयोग सक्षमपणे काम करत असल्याने राज्यात कुठेही महिला अत्याचाराबाबत घटना घडल्यानंतर राज्य महिला आयोगाची आठवण येते. कारण राज्य महिला आयोग आपल्याला न्याय मिळवून देईल असा विश्वास लोकांमध्ये आहे. हे माझं कामाचं यश असल्याचं चाकणकर म्हणाल्या.

पूर्वी अशा घटना घडल्या आहेत ज्यामध्ये नगरचे मुरकुटे यांच्यावर झालेली लैंगिक अत्याचाराबाबत कारवाई झाली आहे. तसेच त्यांच्या मीडिया सेलचे प्रदेश सरचिटणीस हे महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवतात त्याच्यावर आतापर्यंत सोशल मीडियाचे चार गुन्हे दाखल आहेत. एकूणच तुतारी गटाचे पदाधिकारी हे महिलांवर अत्याचार करण्यात आघाडीवर आहेत अशी टीका चाकणकर यांनी केली.

Exit mobile version