· हिवाळ्यातील फळे आणि भाज्यांच्या आगमनामुळे जानेवारीमध्ये ट्रक भाढ्यांमध्ये पुन्हा वाढ दिसून आली
· उत्तर भारतातील थंडीच्या लाटेमुळे मालवाहतूक वाहनांच्या ताफ्याच्या वापरात घट झाल्याने मासिक आधारावर डिझेलच्या वापरातही घट
· व्यावसायिक वाहने आणि मालवाहतूक वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ
· ईव्ही वाहनांच्या विक्रीत मासिक आधारावर वाढ
पुणे – हिवाळी फळे आणि भाज्यांच्या आगमनामुळे भारतातील प्रमुख ट्रक वाहतूक मार्गावर जानेवारी २०२५ मध्ये ट्रक भाढ्यांमध्ये पुन्हा वाढ दिसून आली. श्रीराम मोबिलिटी बुलेटीनतर्फे प्रसिध्द करण्यात आलेल्या अहवालात ही महत्वाची बाब नमूद करण्यात आलेली आहे. गत महिन्याच्या तुलनेत जानेवारीत दिल्ली-मुबई-दिल्ली या मार्गावर भाडेदरात ४%, मुंबई-कोलकत्ता-मुंबई मार्गावर ३.७% त्याचबरोबर दिल्ली-हैद्राबाद-दिल्ली तसेच कोलकत्ता-गुवाहाटी-कोलकत्ता या मार्गावर भाड्यात प्रत्येकी ३.३% दरवाढ झाली आहे.
जानेवारी-मार्च तिमाही हा सामान्यत: खूप व्यस्त कालावधी असतो, ज्यामध्ये रब्बी कापणीनंतर कृषी क्रियाकलाप वाढतात, तसेच अनेक क्षेत्रांमधील उत्पादन क्रियाकलापांमध्ये वाढ होते. विविध क्षेत्रातील कार्याला मिळालेल्या गतीमुळे मालवाहतूकीची वाहने, मालवाहतूकीसाठी वापरल्या जाणाऱ्या तीनचाकी रिक्षा, प्रवासी वाहतूकीच्या बसेस, मॅक्सी कॅब आणि कृषी ट्रेलर्स यासारख्या व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत जानेवारी २०२५ मध्ये वाढ झाली आहे.
महिना-दर-महिन्याच्या तुलनेत मालवाहतूक वाहनांच्या विक्रीत जानेवारीमध्ये ४१%ची लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तीनचाकी मालवाहतूकीची वाहने आणि प्रवासी बसच्या विक्रीत प्रत्येकी ३२% वाढ झाली आहे, तर मॅक्सी कॅबमध्ये ५९% मजबूत मोठी वाढ झाली आहे. याचबरोबर, रब्बी कापणी हंगामाने कृषी ट्रेलसच्या विक्रीत १५% भर झाली. महिना-दर-महिन्याच्या तुलनेत जानेवारीत मोटार कारच्या विक्रीत ५४% तर दुचाकी वाहनांच्या विक्रीत २७% वाढ झालेली आहे.
इलेक्ट्रीक वाहनांच्या (ईव्ही) क्षेत्रात जानेवारीत मासिक आधारावर दुचाकी ईव्ही गाड्यांच्या विक्रीत २१% तर ईव्ही कारच्या विक्रीत १६% वाढ झाली आहे. डिसेंबर २०२४ या महिन्यात ई-वे बिलांत राज्यांतर्गत (इंट्रा स्टेट) आणि आंतरराज्य (इंटर स्टेट) पातळीवर वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मासिक आधारावर इंट्रा स्टेट बिलांत ८.७% तर इंटर स्टेट बिलांत १२% वाढ झाली आहे.
देशभरात असलेल्या थंडीच्या लाटेमुळे रस्त्यावरील व्यावसायिक वाहनांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले आहे. महिना-दर-महिना आधारावर डिझेलचा वापर ४% कमी झाला आहे आणि तर मासिक आधारावर फास्टटॅग व्यवहाराचे प्रमाण आणि मूल्य देखील ०.४% कमी झाले आहे.
श्री. वाय. एस. चक्रवर्ती, व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ, श्रीराम फायनान्स लिमिटेड जानेवारीबाबतच्या अहवालाबाबत भाष्य करताना म्हणाले, “भाडेदरातील वाढ ही मालवाहतूक क्षेत्रासाठी सकारात्मक संकेत आहे. हिवाळ्यातील फळे आणि भाज्यांची आवक वाढल्यामुळे वाहतूक आणि साठवणूक सेवांची गरज वाढली आहे आणि त्यामुळे भाडेदरात वाढ झालेली आहे. तथापि, देशाच्या बहुतेक भागात थंडीच्या लाटेमुळे वाहनांच्या वाहतुकीवर प्रतिकूल परिणाम दिसून आला आहे. त्यामुळे पुरवठा साखळीत काही प्रमाणात व्यत्यय आल्याचे जाणवले आहे.
एका व्यस्त तिमाहीची सुरुवात झाली आहे अँड या तिमाहीत लॉजिस्टिक क्षेत्रामध्ये वाढीव क्रियाकलाप होण्याची अपेक्षा आहे. नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थव्यवस्थेसाठी एक व्यापक मार्गदर्शन मांडण्यात आलेला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील वाढीला आणखी चालना मिळण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त दुचाकी, प्रवासी कार आणि व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यातून ग्राहकांचा वाढता विश्वास, आर्थिक उलाढाल आणि कामकाज प्रकट होते. एकंदरीत, थंडीच्या लाटेमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना न जुमानता, हंगामी मागणीत झालेली वाढ आणि पूरक आर्थिक धोरणांमुळे मालवाहूतक क्षेत्र येत्या काही महिन्यांत मजबूत कामगिरीसाठी सज्ज झालेले आहे.”
भारत आगामी तिमाहीत प्रवेश करत असताना, सर्व श्रेणींमध्ये ट्रक भाडी आणि त्याचबरोबर विविध प्रकारच्या वाहनांच्या विक्रीचे दृष्टीकोन सकारात्मक राहील. आगामी खरीप पेरणी हंगामात कृषी वाहनांच्या विक्रीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. विविध आव्हानांना तोंड देत असता, नवीन धोरणात्मक उपाययोजना आणि किमतीतील संभाव्य कपातींमुळे ईव्ही वाहनांच्या विक्रीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.