उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात विविध आरोग्य मोहिमांचे उद्घाटन

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह, मंत्री महोदयांची प्रमुख उपस्थिती

ठाणे  : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज ठाणे येथे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध आरोग्य मोहिमांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अभिष्टचिंतन केले. कार्यक्रमादरम्यान विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आवडता पिवळ्या चाफ्याचा हार प्रदान केला. त्यांनी हा हार अत्यंत श्रद्धेने स्वीकारला.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नव्या मोहिमा सुरू

यानिमित्ताने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध नवीन आरोग्य मोहिमांचे उद्घाटन करण्यात आले. या मोहिमांमुळे नागरिकांना अधिक सुलभ आणि प्रभावी आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहेत.

जनतेच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा उपक्रम

राज्यातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांचे मान्यवरांनी कौतुक केले. महाराष्ट्राला आरोग्यदृष्ट्या सक्षम आणि रोगमुक्त करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Exit mobile version