पुणे : आयुर्वेदिक उपचाराच्या अभ्यासासाठी ब्राझीलच्या डॉक्टरांची एक टीम पुण्यामध्ये दाखल झाली. आयुर्वेदाचा अभ्यास करताना त्यांना पारंपारिक पद्धतीने व हिंदू धर्मशास्त्र प्रमाणे विवाह करण्याचा मोह आवरला नाही.
Rosangela Oswaldo आणि Brasil हे दोघेही दांपत्य डॉक्टर आहेत. आयुर्वेदिक उपचारासाठी पुण्यात दाखल झाले. काल त्यांचा 22 वर्षानंतर विवाह पुण्यात पार पडला.
Rosangela Oswaldo धोतर कुर्ता पांढरी टोपी असा पोषक यांनी धारण केला होता. तर Brasil तिने नऊवारी साडी परिधान केली होती. पारंपारिक वेश धारण करून या दोघांनी आज विवाह केला. ब्राझील वरून आलेले डॉक्टर यांची वराडी मंडळी होती. तर डॉक्टर ज्यूस रुगे यांनी कन्यादान केलं. यावेळी यांनी गाण्यावर डान्सही केला.
हिंदू धर्म आम्हाला आवडतो त्या पद्धतीने आम्हाला लग्न करायचा आहे अशी इच्छा या दांपत्याने डॉक्टर सुकुमार सर देशमुख यांच्याकडे व्यक्त केली. सुकुमार सर देशमुख यांनी भटजी या ठिकाणी बोलावले मंडपही टाकण्यात आला. यावेळी सप्तपदी मंगलाष्टक म्हणत हा विवाह सोहळा पार पडला. गुलाबी साडी गाण्यावर सर्व नाचत लग्नाचा आनंद घेत होते.