राहुल सोलापूरकर च्या वक्तव्याचा पुण्यात समाचार

राष्ट्रवादीचं समाधान चौकात आंदोलन, टकलू हैवान पोस्टरवर उल्लेख

पुणे:राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहरातर्फे शहराध्यक्ष दिपक मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सायंकाळी बुधवार पेठेतील समाधान चौक येथे अभिनेता राहुल सोलापूरकर याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवारायांच्या इतिहासाची मोडतोड करून बेताल वक्तव्ये करणाऱ्या सोलापूरकर याचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. आणि सोलापूरकर याच्या प्रतिमेला जोडे मारत त्याचा निषेध करण्यात आला. यावेळी या आंदोलनाचे नेतृत्व माजी विरोधी पक्षनेते मा दत्ताभाऊ सागरे यांनी केले. यावेळी विश्रामबाग पोलिस स्टेशन पोलीस निरीक्षक अरुण घोडके व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी योग्य बंदोबस्त लावला होता. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर निषेधाच्या घोषणानी परिसर दनाणून सोडला. यावेळी माजी नगरसेवक शांतीलाल मिसाळ, पुणे शहर महिला अल्पसंख्याक अध्यक्ष नूरजहां शेख, शहर सरचिटणीस शीतल जवंजाळ, शहर दिव्यांग अध्यक्ष पंकज साठे,ग्राहक संरक्षण अध्यक्ष राजेंद्र घोलप, कसबा अध्यक्ष सुप्रिया कांबळे, कसबा कार्याध्यक्ष गोरखनाथ भिकूले, कसबा उपाध्यक्ष संतोष हत्ते, कसबा युवक अध्यक्ष गजानन लोंढे, शिवाजीनगर मतदारसंघ अध्यक्ष अभिषेक बोके, शिवाजीनगर कार्याध्यक्ष बाळासाहेब आहेर, पुणे कँन्टोमेंट अध्यक्ष नरेश जाधव, पुणे कँन्टोमेंट कार्याध्यक्ष राहुल तांबे, ओबीसी अध्यक्ष अतुल जाधव, युवक उपाध्यक्ष गिरीश मानकर, मारुती आवरगंड, नेईम शेख, सुनीता चव्हाण, संजय लाड,शाम शेळके, विजय जाधव, अतुल जाधव, सादिक पटेल, अमूल कलाल, रोहिदास जोरी, फाय्याज खान, प्रदीप चोपडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version