महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पैलवानांवर अन्याय

पैलवान दीपक काकासाहेब पवार यांच्यावर पुणे शहरातून महाराष्ट्र केसरीसाठी अन्यायकारक बंदी

अँकर
कुस्ती हा महाराष्ट्राचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि गौरवशाली खेळ आहे. याच खेळात आपले आयुष्य घालवणारे आणि आपली ओळख निर्माण करणारे अनेक पैलवान महाराष्ट्राने पाहिले आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे पैलवान दीपक काकासाहेब पवार. दीपक पवार हे पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे कुस्तीपटू असून, त्यांनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले नाव उंचावले आहे. मात्र,काल त्यांच्यावर झालेल्या अन्यायकारक निर्णयाने महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमी वर्गात नाराजी पसरली आहे.

पैलवान दीपक पवार यांचे वडील, आदरणीय अर्जुनवीर काकासाहेब पवार, हे 1974 पासून पुणे जिल्ह्यात स्थायिक आहेत. त्यांनी कुस्तीच्या प्रेमामुळे लातूर जिल्ह्यातून पुण्यात येऊन गोकुळ वस्ताद तालीम येथे हरिश्चंद्र बिराजदार मामांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. कुस्तीने त्यांना नाव, प्रतिष्ठा, आणि सर्व काही दिले. त्यांनी पुण्यात कात्रज-आंबेगाव येथे स्वतःची जागा खरेदी करून भव्य तालीम उभारली.

काकासाहेब पवार यांचे सर्व कायदेशीर कागदपत्रे (आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, पॅन कार्ड, डोमेसाईल सर्टिफिकेट) पुणे जिल्ह्याचे असल्याचे पुरावे आहेत.

त्यांचे चिरंजीव, दीपक पवार, यांचे आधार कार्ड व रहिवासी दाखल्यावरही पुणे जिल्ह्याचा उल्लेख आहे.

दीपक यांनी याआधी अनेक वेळा पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत भाग घेतला असून, पदकेही मिळवली आहेत.

पैलवान दीपक पवार यांना महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुणे शहराचे प्रतिनिधित्व करण्यास मज्जाव करण्यात आला. हा निर्णय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ हा श्रेयवाद आणि संघटनांमधील वादांमुळे घेतला गेला आहे असा आरोप करण्यात येत आहे. असा अन्यायकारक निर्णय एखाद्या कुस्तीपटूच्या भविष्याला धक्का पोहोचवणारा आहे.

नियमावलीनुसार, 1974 पासून काकासाहेब पवार पुण्यात राहिले आहेत, त्यामुळे त्यांचा मुलगा दीपक पवार हा पुण्याचा स्थायिक नागरिक आहे
त्यांचा निवड रोखण्याचा कोणताही वैध कायदेशीर आधार नाही.भारतीय राज्यघटनेच्या कलम 19(1)(e) नुसार, प्रत्येक भारतीय नागरिकाला देशात कोणत्याही ठिकाणी वास्तव्य करण्याचा आणि व्यवसाय करण्याचा मूलभूत हक्क आहे.
या हक्काचा विचार करता, पैलवान दीपक पवार यांना पुणे जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करण्यापासून रोखणे हा त्यांच्या अधिकारांचा स्पष्ट भंग आहे.
हा निर्णय, कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्याऐवजी, त्यांच्या हक्कांवर गदा आणतो.

सोशल मीडियावर नवीन संघटनांचे पदाधिकारी मोठमोठे दावे करत आहेत की महाराष्ट्राची कुस्ती आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. मात्र, अशा निर्णयांमुळे कुस्तीला प्रोत्साहन मिळण्याऐवजी खेळाडूंच्या हक्कांवर अन्याय होतो.
काल पैलवान तुषार डुबे यांनीही आपल्या मुलाखतीत त्यांच्या वर लादलेली बंदी अन्यायकारक असल्याचे स्पष्ट केले. तुषारप्रमाणेच दीपक पवार यांनाही जिल्हा बंदीच्या नावाखाली रोखण्यात आले आहे, जी कुस्तीच्या मूलभूत तत्वांशी आणि खेळाडूंच्या प्रगतीशी विरोधाभास करते.पैलवान दीपक काकासाहेब पवार यांच्यावर लादलेला निर्णय हा पूर्णपणे अन्यायकारक आहे. ते पुणे जिल्ह्याचे कायदेशीर रहिवासी आहेत हे त्यांच्या कागदपत्रांवरून सिद्ध होते. कुस्तीला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देण्यासाठी संघटनांनी आपले वाद बाजूला ठेवून खेळाडूंच्या विकासावर भर द्यावा. अशा निर्णयांमुळे फक्त खेळाडूंचे मनोबलच खचत नाही तर महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राची प्रतिमा खराब होण्याचा धोका आहे.

कुस्ती हा फक्त खेळ नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा भाग आहे. अशा अन्यायकारक निर्णयांना विरोध करून खेळाडूंना योग्य न्याय मिळवून देणे, ही प्रत्येक कुस्तीप्रेमीची जबाबदारी आहे. अशा भावना अनेक अन्याय झालेल्या पैलवानांनी बोलून दाखवल्या.

Exit mobile version